Navpancham Rajyog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी बुध आणि गुरू एकमेकांपासून १२० अंशांवर असतील. या दोन्ही ग्रहांच्या या संरेखनामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. बुध आणि गुरूच्या या नवपंचम राजयोगाचा काही राशींना बक्कळ फायदा होणार आहे. तर मग जाणून घेऊया या राजयोगाचा लाभ मिळणाऱ्या कोणत्या पाच राशी आहेत…

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोगामुळे करिअंरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा नवीन नोकरी शोधत असाल तर तुमची इच्छा आता पूर्ण होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होण्याचेही मजबूत संकेत आहेत. तुमच्या निर्णय क्षमतेत सुधारणा होईल, त्यामुळे व्यवसायात मोठा नफा मिळू शकेल.

मिथुन राशी

बुध मिथुन राशीवर राज्य करत असल्याने गुरूसोबतची ही युती तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. अडकलेले पैसे परत येतील. गुंतवणुकीसाठी हा सुवर्णकाळ ठरू शकतो. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. शिक्षण किंवा संशोधनात गुतलेल्यांना मोठे यश मिळेल.

सिंह राशी

हा राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्याचे दरवाजे उघडेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा किंवा घर तसंच कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यश निश्चित आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकाल.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी बुध-गुरू युतीमुळे त्यांच्या सुखसोयी वाढतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचे बोलणे गोड होईल, त्यामुळे कठीण कामेही सोडवणे सोपे होईल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

धनु राशी

धनु राशीवर देवांचा गुरू ग्रहाचे राज्य आहे. बुधाशी या नवपंचम युतीमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसाय विस्ताराच्या नवीन संधी निर्माण होतील. जर तुम्ही परदेश प्रवास किंवा परदेश व्यापारात सहभागी असाल तर तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण असेल आणि तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या मानसिक ताणतणावापासून मुक्तता मिळेल.