Planet Prediction March 2024: ज्योतिष शास्त्रानुसार मार्च महिना खूप खास आहे, या महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी बदलत असतात. राशी गोचरसह ग्रहांची युती होणार आहे ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योगाचा निर्माण होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हे महिने बुध, शुक्र, सुर्य, मंगळ राशी बदलत आहे. त्यासह बुध आणि शनीचा उदयही होत आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या राशीच्या गोचरचा परिणाम काही राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होणार आहे. कोणत्या राशींची नशीब उजळणार आहे जाणून घेऊ या….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह ७ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करत आहे. जिथे राहु ग्रह आधीपासून विराजमान आहे. अशा स्थितीत बुध आणि राहूची युती होणार आहे. तसेच शुक्र सुद्धा ७ मार्चला कुंभ राशीत प्रवेश करत आहे. जिथे शनि ग्रह आधीपासून विराजमान आहे. अशा स्थितीत सुमारे ३० वर्षांनी कुंभ राशीमध्ये शुक्र आणि शनीचा युती होणार आहे. तसेच सूर्यही कुंभ राशीत आहे. १४ मार्च रोजी ग्रहांचा राजा सूर्य मीन राशीत प्रवेश करणार असून, बुध ग्रहासह युती झाल्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे. सूर्य आणि राहूच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होत आहे. त्यानंतर १५ मार्चला बुध मीन राशीत आणि १८ मार्चला शनि कुंभ राशीत उदय होईल.

वृषभ राशी

ग्रहांच्या या महागोचरचा या राशीवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हे संपूर्ण वर्ष केवळ आनंद घेऊन येऊ शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. यामुळे तुमचा अध्यात्माकडे कल वाढेल. अशा स्थितीत तीर्थयात्रेलाही जाता येते. नोकरदारांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आता त्यांना मिळणार आहे. तसेच उच्च अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांनी या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. मार्च महिन्यात उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.

हेही वाचा – बुध गोचरमुळे निर्माण होईल शश आणि बुधादित्य राजयोग; ‘या’ राशींसाठी सुरू होईल सुवर्णकाळ, मिळेल अमाप पैसा

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिनाही चांगला राहू शकतो. एकीकडे शनी उदय होत आहे. दुसरीकडे, शनी, शुक्र आणि सूर्य यांची युती होत आहे. अशा परिस्थितीत कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना खूप चांगला जाणार आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर तुम्ही सहज मात कराल. यासह व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांनाही अनेक प्रकारचे आनंद मिळू शकतात. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. तसेच तुम्ही तुमच्या मुलांसाठी आनंदी राहाल. जीवनात सकारात्मकता वाढेल. आर्थिक परिस्थिती मजबूत झाल्यामुळे तुम्ही बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

हेही वाचा – रथसप्तमीला बुधादित्य योगामुळे चमकेल ‘या’ ५ राशीच्या लोकांचे भाग्य; मिळू शकते आनंदाची बातमी

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी मार्च महिना खूप चांगला जाणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित काम पुन्हा एकदा सुरू होईल. यासह तुम्हाला वडील, गुरु यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. घरात अनेक दिवसांपासून सुरू असलेले वाद आता संपुष्टात येऊ शकतात. शुक्राच्या कृपेने तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होईल. यामुळे मुलांच्या बाजूने सुरू असलेल्या समस्याही संपुष्टात येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढेल. तुम्ही घेतलेला निर्णय आता यशस्वी होऊ शकतो. तुमचे बोलणे खूप प्रभावी ठरू शकते. वैवाहिक जीवनासाठी हा महिना खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grah gochar march 2024 sun mars venus mercury transit and saturn rise positive impact on these zodiac sign planet prediction march snk
First published on: 21-02-2024 at 18:15 IST