Grah Gochar November 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात सूर्य, मंगळ आणि बुध यांच्यासह एकूण ६ ग्रह आपली चाल बदलणार आहेत. ग्रहांच्या या बदलाचा परिणाम देश-दुनियासह सर्व १२ राशींवर होईल. कोणत्या राशींसाठी नोव्हेंबर महिना शुभ राहील आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल, तसेच ग्रहांच्या बदलाचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

नोव्हेंबर २०२६ मधील ग्रहांचे गोचर

६ नोव्हेंबर: शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करेल.

१२ नोव्हेंबर: मंगळ ग्रह कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करेल.

१३ नोव्हेंबर: बुध ग्रह मार्गी होईल.

१४ नोव्हेंबर: शुक्र ग्रह कन्या राशीत मार्गी होईल.

१६ नोव्हेंबर: सूर्य देव तूळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

२५ नोव्हेंबर: राहु आणि केतू राशी बदलतील. राहू मकर राशीत तर केतू कर्क राशीत प्रवेश करेल.

कोणत्या राशींसाठी शुभ राहील नोव्हेंबर महिना?

ग्रह-नक्षत्रमानानुसार नोव्हेंबर महिना सिंह, वृश्चिक, तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो.

सिंह: आत्मविश्वास वाढेल आणि नोकरी-व्यवसायात उत्तम यश मिळेल.

वृश्चिक: ऊर्जा वाढलेली असेल आणि रखडलेली कामे पूर्ण होतील.

तूळ: आर्थिक लाभ होईल आणि कौटुंबिक जीवनात आनंद नांदेल.

धनु: व्यवसायात फायदा होईल. नोकरदार व्यक्तींना मोठी जबाबदारी किंवा बढती मिळू शकते.

याशिवाय वृषभ, मिथुन, कन्या, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना सामान्य राहील.

कोणत्या राशींसाठी महिना आव्हानात्मक असू शकतो?

नोव्हेंबर महिन्यात काही राशींच्या लोकांना सावध राहावे लागेल.

कर्क: मंगळाच्या स्थितीमुळे आरोग्यात चढ-उतार येऊ शकतात. आर्थिक व्यवहारांमध्ये काळजी घ्यावी.

मकर: राहुच्या गोचरमुळे मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे योग आणि ध्यानाचा आधार घेणे फायदेशीर ठरेल.

मेष: या राशीच्या लोकांनाही नोव्हेंबरमध्ये सतर्क राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)