scorecardresearch

१३ नोव्हेंबरला दोन ग्रह बदलतील त्यांची चाल; ‘या’ ६ राशीच्या लोकांना होऊ शकतो बक्कळ धनलाभ; नशीब असणार जोरावर

Grah Rashi Parivartan 2022 November: या सहा राशीच्या लोकांना ग्रहांच्या संक्रमणाचा फायदा होऊ शकतो.

१३ नोव्हेंबरला दोन ग्रह बदलतील त्यांची चाल; ‘या’ ६ राशीच्या लोकांना होऊ शकतो बक्कळ धनलाभ; नशीब असणार जोरावर
photo(pixabay)

Grah Rashi Parivartan 2022 November: ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात जे काही घडतं त्याचा संबंध हा ग्रहांच्या हालचाली बदलण्यावर अवलंबून असतो. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली गती बदलतो तेव्हा सर्व राशीच्या लोकांवर त्याचा परिणाम दिसून येतो. १३ नोव्हेंबर रोजी दोन ग्रह आपली गती बदलतील. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल आणि बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. त्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर याचा परिणाम होईल. चला जाणून घेऊया या ग्रहांच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

वृषभ राशी

वृषभ राशीचे लोक जे परदेशाशी संबंधित व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरण्याची शक्यता आहे. या काळात या राशीच्या लोकांचे आरोग्यही चांगले राहील. यासोबतच तुम्हाला आयुष्यात अनेक नवीन संधी देखील मिळतील.

(हे ही वाचा: १७ जानेवारीपासून ‘या’ राशींचे सुरू होतील ‘अच्छे दिन’; शनिदेवाची असेल विशेष कृपा, मिळेल अफाट पैसा)

वृश्चिक राशी

या राशीच्या लोकांसाठी मंगळ सहाव्या घराचा स्वामी आहे आणि बुध आठव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. बुधाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते. जे लोक नवीन व्यवसाय सुरू करत असतील तर त्यांच्यासाठी हा काळ चांगला राहील आणि पैसाही मिळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही हा काळ चांगला असू शकतो.

धनु राशी

या राशीच्या लोकांसाठी बुध सातव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे करिअरमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

( हे ही वाचा: यंदाच्या भाऊबीजेला बुधग्रह बदलणार आपली राशी; ‘या’ लोकांचे नशीब पालटणार, मिळणार अपार पैसा)

मकर राशी

मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी बुध ग्रहाचे संक्रमण लाभदायक ठरू शकते. तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. दुसरीकडे, संशोधन इत्यादींशी संबंधित लोकांसाठी मंगळाचे संक्रमण चांगले असू शकते.

कुंभ राशी

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध हा पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे. काही रहिवाशांना क्षेत्रात फायदा होऊ शकतो. या काळात घरातील वातावरणही शांत राहील. अनेक प्रश्न मार्गी लागतील.

( हे ही वाचा: दिवाळीपूर्वी शनिदेव ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकवणार; मिळेल बक्कळ संपत्तीसह नशिबाची मजबूत साथ)

कर्क राशी

कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ असू शकते. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. त्याचबरोबर अनेक लोकांच्या अनेक इच्छा देखील या काळात पूर्ण होऊ शकतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या