Kumbha Rashi Grahan Yog 2026 : १३ एप्रिल रोजी एक विशेष योग तयार होणार आहे. सध्या सूर्य आणि राहू कुंभ राशीत आहे, जेव्हा चंद्र या राशीत प्रवेश करेल तेव्हा तीन ग्रहांच्या युतीने ग्रहण योग तयार होईल. चंद्र, सूर्य, राहू होणाऱ्या ग्रहण योगाचा अनेक राशींवर परिणाम होईल. हा योग काही राशींसाठी विशेष असला तरी काही राशींवर त्याचा नकारात्मक परिणाम होईल. पण, ग्रहण योगामुळे कोणत्या राशींवर परिणाम होईल जाणून घेऊ…
ग्रहण योगाने कोणत्या राशींवर परिणाम होईल?
कन्या
कन्या राशीच्या लोकांवर ग्रहण योगामुळे नकारात्मक परिणाम होईल. तुमचे वाद होऊ शकतात, त्यामुळे वादांपासून दूर रहा. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत काही बदल करायचे असतील तर तुम्हाला थोडं थांबणं फायद्याचं ठरेल. घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका.
मीन
मीन राशीसाठी हा चांगला काळ असेल. या राशीच्या व्यक्तींमध्ये गैरसमज वाढू शकतात. तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला मानसिक तणावही जाणवू शकतो. निर्णय घेताना जरा काळजीपूर्वक घ्या, त्यामुळे सल्ला घ्या किंवा विचारपूर्वक निर्णय घ्या.
कर्क
दबावामुळे कर्क राशीच्या लोकांना तणाव येऊ शकतो. चिंता आणि विचलितपणामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल, म्हणून संयम बाळगा आणि प्रत्येक गोष्टीवर काळजीपूर्वक निर्णय घ्या.
(टीप – वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
