Today Horoscope 19 March 2026 In Marathi : आज १९ मार्च २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असणार आहे. त्याचबरोबर शुक्ल योग जुळून येईल आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १ वाजता सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. आज पासून मराठी नववर्षाची सुरुवात होणार असून गुढीपाडवा सण साजरा करण्यात येणार आहे. तर गुढीपाडव्याचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊयात…
दैनिक पंचांग व राशिभविष्य, १९ मार्च २०२६ (Dainik Rashi Bhavishya 19 March 2026 In Marathi)
आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. बोलताना वाणीत गोडवा ठेवाल. गायक लोकांचे कौतुक केले जाईल. झोपेचे तक्रार जाणवेल. चटपटीत पदार्थ चाखाल.
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
सर्वजण तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची वागणूक प्रेमळपणाची असेल. आल्या गेल्याचे उत्तम स्वागत कराल. गोड बोलून कार्यभाग साधता येईल. प्रलोभनाला बळी पडू नका.
आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
चैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढेल. जोडीदाराच्या सौख्यात रममाण व्हाल. स्पष्टपणे बोलणे टाळावे. फसवणुकीपासून सावध सहा. मानसिक चंचलता जाणवेल.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मुलांच्या कला गुणांचे कौतुक कराल. हौस मौज पूर्ण करून घ्याल. स्त्रियांच्या सहवासात वावराल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
कामे मनाजोगी पार पडतील. मुलांच्या प्रगतीचे कौतुक कराल. जोडीदाराबरोबर मनमोकळी चर्चा कराल. काही कामे अकारण खोळंबतील. वात-विकाराचा त्रास जाणवेल.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
परोपकाराचे महत्व समजून घ्याल. धार्मिक कामांत हातभार लावाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सर्वांना सहृदयतेने मदत कराल. नातेवाईकांशी विसंवाद टाळावा.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
कामातून समाधान शोधाल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळच्या नातेवाईकांची नाराजी दूर करावी. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. मित्रा मंडळींचा गोतावळा जमा कराल. उत्तम गृह सौख्य लाभेल. पत्नीचे विचार आग्रही वाटू शकतात. प्रेमप्रकरणात जवळीक वाढेल.
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
नोकर-चाकरांचे सौख्य मिळेल. भावंडांची मदत घेता येईल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. आपल्या काही गोष्टींचे परिक्षण करावे.
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
व्यावहारिक बुद्धिमत्ता वापरावी. काही गोष्टींचा सारासार विचार करावा. फार खोलात जाऊन अर्थ काढू नयेत. हातात नवीन अधिकार येतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल.
आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
अभ्यासू वृत्तीने गोष्टी समजून घ्याल. तुमचा अंदाज बरोबर ठरेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. सामुदायिक भानगडीत लक्ष घालू नका. नसत्या वादविवादात अडकू नका.
आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
मित्रांशी मतभेद संभवतात. दिवसभर कामात व्यग्र राहाल. कानाच्या विकारांवर वेळीच उपाय करावेत. कष्टाला मागे पुढे पाहू नका. फसव्या लोकांपासून दूर राहावे.
