Rajyog in August Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि सूर्य यांची युती अतिशय शुभ मानली जाते. सध्या कर्क राशीत या दोन्ही ग्रहांची युती झाली असून त्यामुळे गुरू-आदित्य राजयोग तयार झाला आहे. हा राजयोग ज्ञान, मान-सन्मान, उच्च पद आणि आध्यात्मिक प्रगती देणारा मानला जातो. कर्क राशीत हा शुभ योग १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत राहणार आहे. जाणून घ्या, या योगामुळे कोणत्या राशींना मोठा लाभ मिळणार आहे.

मेष राशी (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी गुरू-आदित्य राजयोग एखाद्या चमत्कारापेक्षा कमी ठरणार नाही. आर्थिक स्थिती मजबूत राहील. भागीदारीच्या कामांमध्ये चांगला नफा मिळेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. प्रवासातून चांगला फायदा होईल. घर किंवा वाहनाचे सुख मिळू शकते. धार्मिक आणि आध्यात्मिक कामांमध्ये मन रमेल. एखाद्या धार्मिक यात्रेला जाण्याची संधी मिळू शकते.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

१७ ऑगस्टपर्यंतचा काळ तुमच्या आर्थिक बाबतीत खूप चांगला राहणार आहे. या काळात एखाद्या गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळू शकतो. व्यवसायातही चांगली कमाई होण्याचे योग आहेत. या काळात अनेक मार्गांनी पैसे कमवण्यात तुम्हाला यश मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. वडिलोपार्जित संपत्तीचाही चांगला लाभ मिळेल. धार्मिक कामांमध्ये आवड वाढेल. एखाद्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभू शकते.

कर्क राशी (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी गुरू-आदित्य राजयोग शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत होईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगली कमाई होईल. घरात एखादा शुभ किंवा मंगल कार्यक्रम होऊ शकतो. या काळात एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची संधी मिळू शकते.

सिंह राशी (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरू-आदित्य राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. या काळात मनासारखी नोकरी मिळण्याचे शुभ योग आहेत. जुन्या आजारातून आराम मिळू शकतो. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ ठरेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)