Premium

३० ऑक्टोबरपासून सिंहसह ‘या’ राशींना मिळेल अपार धन? राहू अन् गुरुची अशुभ युती संपल्याने येऊ शकतात सुखाचे दिवस

गुरु-राहूच्या युतीने बनलेला अशुभ योग संपल्याने ‘या’राशींना प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात…

Guru And Rahu Yuti
'या' राशींचे भाग्य चमकणार? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. यासोबतच ग्रहाच्या हालचालीत होणारा बदल देखील काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. आता राहू ३० ऑक्टोबर २०२३ ला राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे राहू आणि गुरुची अशुभ युती संपणार आहे. यामुळे काही राशींना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींना होणार धनलाभ?

मेष राशी

गुरु आणि राहू यांची युती संपल्याने मेष राशीतील लोकांचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. या राशीच्या लोकांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मान सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : शनिदेव दोन वर्ष मकरसह ‘या’ राशींच्या लोकांना देणार बक्कळ पैसा? साडेसातीपासून मुक्ती मिळून होऊ शकता लखपती )

सिंह राशी

गुरु आणि राहू यांची युती संपल्याने सिंह राशींतील लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांना पद, प्रतिष्ठा, मालमत्तेच्या गुंतवणुकीतून चांगला नफा, मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकतो. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होऊ शकतात. या काळात आरोग्य सुधारु शकतो. नात्यात गोडवा येऊ शकतो. या काळात आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. 

धनु राशी

या राशींसाठी येणारे दिवस आनंददायी ठरु शकतो. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. धन आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळू शकतो. जमीन, घर, वाहन आदी क्षेत्रातील गुंतवणूक फायदेशीर ठरु शकतो. या काळात . भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. या काळात तुम्हाला काही मोठा आर्थिक लाभही मिळू शकतो. दरम्यान तुमचे प्रेम जीवनही खूप चांगले जाऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Guru and rahu yuti end 30 october these three zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb

First published on: 24-09-2023 at 16:22 IST
Next Story
पुढच्या आठवड्यात ‘या’ राशींचे लोक बक्कळ पैसा कमावणार? टॅरो कार्डनुसार तुम्हाला काय फायदा होऊ शकतो जाणून घ्या