Guru Ashlesha Nakshatra Gochar 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, देवांचा गुरू ग्रह गुरु हा ज्ञान, समृद्धी, संतती आणि सुखाचा कारक मानला जातो. तर शनिदेवाला कर्म आणि न्यायाचे प्रतिक मानले जाते. जेव्हा गुरु ग्रह शनीच्या नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या जीवनावर होईल, २०२६ मध्ये गुरुचे बुधाच्या अश्लेषा नक्षत्रातील प्रवेश अनेक राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणू शकतो.

१९ ऑगस्टच्या नक्षत्रांतरानंतर गुरूची ही स्थिती विशेषतः चार राशींसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. चला जाणून घेऊया की, या काळात कोणत्या चार राशींचे भाग्य उजळून शकते.

वृषभ

गुरू ग्रहाच्या स्थिती बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. या काळात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी १९ ऑगस्टपर्यंतचा काळ अत्यंत अनुकूल असेल. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला पूर्वी अडकलेली रक्कम परत मिळू शकेल.

मिथुन

मिथुन राशीसाठी हा काळ करिअर आणि व्यवसायात नवीन संधी घेऊन येईल. शनीच्या नक्षत्रात गुरूच्या उपस्थितीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना यश मिळू शकते. कौटुंबिक जीवन सुसंवादी राहील.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फलदायी ठरेल. गुरू आणि शनिच्या या योगाने उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. गुंतवणुकीतून नफा होण्याची दाट शक्यता आहे. जर एखादे कायदेशीर किंवा मालमत्तेशी संबंधित प्रकरण बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल, तर ते तुमच्या बाजूने निकाली निघू शकते. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल.

कुंभ

कुंभ ही शनि ग्रहाची स्वराशी आहे, त्यामुळे गुरूचे शनीच्या नक्षत्रातील गोचर कुंभ राशीसाठी शुभ ठरेल. १९ ऑगस्टपर्यंत तुमच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होऊ शकते. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना एक चांगली संधी मिळू शकते. आध्यात्मिक कार्यांकडे कल वाढेल, ज्यामुळे मानसिक शांती लाभेल.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)