guru ashlesha nakshtra gochar : देवगुरू गुरु ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून ०३ मिनिटांनी आश्लेषा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहे. सध्या गुरु कर्क राशीत भ्रमण करत असून, कर्क राशीत त्याला उच्च स्थान प्राप्त आहे. आश्लेषा नक्षत्राचा चौथा चरण मीन नवमांशाशी संबंधित असून, गुरु मीन राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात गुरुचे स्थान आणि प्रभाव दोन्ही बलवान मानले जातात. हा काळ ज्ञान, शिक्षण, बुद्धिमत्ता, धर्म आणि योग्य निर्णयक्षमता वाढवणारा मानला जाऊ शकतो. आश्लेषा नक्षत्र सखोल विचार, रणनीती, संशोधन आणि परिस्थिती समजून घेण्याच्या क्षमतेशी संबंधित मानले जाते. गुरु ३१ ऑक्टोबरपर्यंत आश्लेषा नक्षत्राच्या या चरणात राहील. त्यानंतर तो मघा नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करेल. त्यामुळे गुरुच्या या नक्षत्र प्रवेशाचा कोणत्या राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, हे जाणून घेऊया.
मिथुन
गुरु दुसऱ्या स्थानात आहे, जे धन, बचत, कुटुंब आणि वाणीशी संबंधित आहे. त्यामुळे या काळात, आर्थिक स्तिथी सुधारण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना पगारवाढ, नवीन जबाबदाऱ्या किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. व्यवसायात तुमचा सल्ला आणि संवाद प्रभावी ठरेल. कौटुंबिक निर्णयांमध्येही तुम्हाला पाठिंबा मिळेल.
कर्क
गुरु तुमच्याच राशीत भ्रमण करत असून, तो येथे उच्च राशीत स्थित आहे. आश्लेषा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश केल्यामुळे तुमची निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. तर वैयक्तिक जीवनात सकारात्मकता नांदेल. जे लोक बऱ्याच काळापासून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना नवीन दिशा मिळू शकते.
कन्या
गुरु तुमच्या राशीच्या कुंडलीच्या अकराव्या घरात आहे, जे घर नफा, उत्पन्न, संबंध आणि इच्छापूर्तीचे घर मानले जाते. यादरम्यान जुन्या ओळखींचा फायदा होऊ शकतो आणि प्रभावशाली नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन भूमिकेबद्दलची चर्चा पुढे जाऊ शकते. व्यवसायात नेटवर्किंग फायदेशीर ठरेल. मीडिया, शिक्षण, वित्त आणि डिजिटल क्षेत्रातील लोकांना संधी मिळू शकतात.
वृश्चिक
गुरू नवव्या घरात आहे. जे घर भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, गुरू आणि लांबच्या प्रवासाशी संबंधित आहे. या काळात, तुम्हाला शिक्षण किंवा करिअरशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांवर मार्गदर्शन मिळू शकते. उच्च शिक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दूरस्थ प्रकल्पांशी संबंधित कामात प्रगती होऊ शकते. वरिष्ठ किंवा गुरूंचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो.
मकर
तुमच्या राशीच्या कुंडलीत गुरू सातव्या घरात आहे, जे विवाह, भागीदारी आणि जनसंपर्क दर्शवते. नातेसंबंध अधिक स्थिर होऊ शकतात आणि अविवाहित व्यक्तींसाठी विवाहासंबंधी चर्चा पुढे जाऊ शकते. व्यावसायिकांना नवीन भागीदार किंवा महत्त्वाचे ग्राहक मिळू शकतात. त्यामुळे सार्वजनिक व्यवहारात प्रतिष्ठा मजबूत होऊ शकते.
मीन
गुरु पाचव्या घरात आहे, जे शिक्षण, बुद्धिमत्ता, संतती, प्रेम आणि सर्जनशीलतेशी संबंधित मानले जाते. तुमच्या राशीसाठी नवमांशाशी असलेला संबंध विशेष महत्त्वाचा मानला जातो. विद्यार्थ्यांना वाढलेली एकाग्रता आणि अभ्यासासाठी आखलेल्या योग्य रणनीतीचा फायदा होऊ शकतो. लेखन, माध्यम आणि कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात.
