Jupiter Combust in Taurus: ज्योतिषशास्त्रात बृहस्पतिला देवतांचा गुरू म्हटले गेले आहे. त्याला सर्वोत्तम दृष्टी असलेला ग्रह मानण्यात आला आहे.  वैदिक ज्योतिषशास्त्रात राशी बदलाला फार महत्त्व आहे. सुमारे वर्षभर गुरू एकाच राशीत, म्हणजे स्वत:च्या मेष राशीत विराजमान आहे. १ मे २०२४ रोजी दुपारी १२:५९ वाजता गुरू मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर ३ मे २०२४ रोजी वृषभ राशीतच गुरुचा अस्त होईल. गुरुच्या या चालीचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसणार आहे. गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं, त्यांना आर्थिक लाभही मिळू शकतो. आता या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

‘या’ राशींच्या लोकांचे दिवस पालटणार!

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी बृहस्पति ग्रहाची स्थिती खूप शुभ ठरु शकते. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन सौदे मिळू शकतात ज्यातून मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारण्याची शक्यता आहे. तसंच, या काळात असलेली कोणतीही इच्छा नक्की पूर्ण होऊ शकेल. जर एखाद्या आजाराने तुम्हाला दीर्घकाळ त्रास दिला असेल तर तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो.

May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Shani Day Sankashti Chaturthi Rashi Bhavishya 27th April Panchang
संकष्टी चतुर्थी राशी भविष्य: शनी देवाच्या वारी गणपती येणार दारी; मेष ते मीन पैकी कुणाचा दिवस होईल मोदकासारखा गोड
Lakshmi Narayan Yog
Lakshmi Narayan Yog : लक्ष्मीनारायण योग तयार झाल्याने ‘या’ राशींना मिळणार छप्परफाड पैसा, अचानक होणार धनलाभ
Akshaya Tritiya 2024
Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयाच्या दिवशी ‘या’ राशींचे बदलणार नशीब, होणार मालामाल
Shani Copper Effect In Gochar Kundali Of These Three Rashi Saturn Effect of Sadesati
शनी निघाले तांब्याच्या पावलांनी, ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ; तुम्हाला मिळेल का पेढे वाटण्याची गोड संधी?
Guru Gochar 2024
Guru Gochar 2024 : १ मे पासून बदलणार ‘या’ राशींचे नशीब, गुरू गोचर देणार बक्कळ पैसा
shash rajyog and malvyay rajyog
Astrology : दोन खास राजयोगामुळे ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? मिळणार बक्कळ पैसा

(हे ही वाचा : ३६५ दिवस ‘या’ ४ राशींना शनिदेव करणार मालामाल? शनि जूनमध्ये वक्री अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती )

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्या प्रत्येक कामात यश मिळू शकते. एखाद्या कामात दीर्घकाळ अडथळे येत असतील तर ते दूर होऊ शकतात. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे. जे अविवाहित आहेत त्यांना जोडीदार मिळू शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा राहू शकतो आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी काळ चांगला ठरु शकतो. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी वेळ अनुकूल राहील. व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत देखील निर्माण होतील ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशप्राप्ती होऊ शकेल. या काळात पद आणि प्रतिष्ठा दोन्हींमध्ये वाढ होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)