ज्योतिषशास्त्रानुसार, ठराविक काळानंतर नवग्रह राशी परिवर्तन करतात. या राशी बदलामुळे अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. अशातच आता मेष राशीत राहू आणि गुरूच्या युतीमुळे गुरु चांडाळ योग तयार झाला होता. तर २२ एप्रिलपासून मेष राशीत गुरु चांडाळ योग सुरू आहे. या योगाच्या निर्मितीमुळे आरोग्याच्या समस्यांपासून नातेसंबंधातील समस्यांपर्यंत प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच या योगाच्या काळात नशीब तुम्हाला अजिबात साथ देत नाही. प्रत्येक क्षेत्रात संघर्ष करावा लागतो. परंतु गुरु चांडाळ योग ३० ऑक्टोबर २०२३ पासून समाप्त होणार आहे. ज्याचा अनेक राशींना फायदा होऊ शकतो. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ या.
ज्योतिषशास्त्रानुसार, ३० ऑक्टोबर रोजी पापी ग्रह राहू आपली राशी बदलत आहे. तो मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे ३० ऑक्टोबरपासून मेष राशीतील गुरु चांडाळ योग संपणार आहे.




गुरु चांडाळ योग संपल्याचा ‘या’ राशींना लाभ होऊ शकतो –
मेष रास
मेष राशीतच गुरु चांडाळ योग तयार झाला होता. जो ३० ऑक्टोबरला संपत असल्यामुळे या राशींचे भाग्य बदलू शकते. नशिबाने साथ दिल्यास प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या काळातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. गुरु चांडाळ योग संपुष्टात आल्याने गुरूंचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. त्यामुळे समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. तसेच तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करु शकता.
कर्क रास
राहुने मीन राशीत प्रवेश केल्यामुळे या राशीच्या लोकांवरचा गुरु चांडाळ योगाचा अशुभ प्रभाव नाहीसा होऊ शकतो. त्यामुळे या काळात तुम्ही कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. तुमच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते. तसेच तुम्हाला प्रमोशनसह मोठी जबाबदारी मिळू शकते. मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक स्थिती पुन्हा मजबूत होण्याची दाट शक्यता आहे.
मकर रास
मकर राशीच्या लोकांना हा योग संपल्याचा विशेष लाभ मिळू शकतो. कारण गुरु चांडाळ योग ३० ऑक्टोबरला संपत आहे आणि या राशीत शनीची साडे साती चालू आहे. अशा स्थितीत राहूचा अशुभ प्रभाव कमी झाल्यामुळे शनीही थोडा शांत राहू शकतो. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढण्यासह तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तसेच वैवाहिक जीवनातील समस्याही संपू शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)