Gajkesari Rajyog : ज्योतिषशास्त्रामध्ये कोणत्याही ग्रहाचे राशी परिवर्तन खूप महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, २८ मे ला चंद्र मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्याच्या काही दिवसापूर्वी १४ मे रोजी गुरू सुद्धा मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. २८ मे गुरू आणि चंद्राची युती मिथुन राशीमध्ये गजकेसरी योग निर्माण करणार आहे. हा योग जवळपास ५२ तास मध्येच ३० मे पर्यंत राहीन. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग अत्यंत शुभ मानला जातो. जाणून घेऊ या गजकेसरी योग निर्माण झाल्याने कोणत्या राशींचे चांगले दिवस सुरू होईल.
वृषभ राशी
गजकेसरी योग निर्माण झाल्याने वृषभ राशीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये यश प्राप्त होईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसेल. नवीन बिझनेसची सुरुवात होऊ शकते, ज्यामुळे लाभ मिळू शकतो. व्यवसायात आर्थिक प्रगतीच्या संधी मिळतील. धन स्थिती उत्तम राहीन.
सिंह राशी
गजकेसरी राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी उत्तम राहीन. व्यवसायात या दरम्यान जबरदस्त लाभ होईल. धन स्थितीमध्ये वृद्धी होईल नोकरी करणार्या लोकांचे प्रमोशन होऊ शकते आणि त्यांना ऑफर मिळू शकते. व्यवसायात गुंतवणुकीतून चांगला धन लाभ मिळेन.
वृश्चिक राशी
गजकेसरी योग निर्माण झाल्याने वृश्चिक राशीच्या लोकांसाठी व्यवसायात मोठा लाभ मिळू शकतो. कार्य क्षेत्राची स्थिती मजबूत राहीन. बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना मोठा फायदा मिळू शकतो. धन स्थिती उत्तम राहीन. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.
कुंभ राशी
गजकेसरी योग निर्माण झाल्याने कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला लाभ मिळेन. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात जबरदस्त आर्थिक लाभ होऊ शकतो. गुंतवणूकीत चांगला लाभ होईल. व्यवसायात चांगला नफा मिळेल.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी गुरु चंद्राचा गजकेसरी राजयोग अत्यंत मंगलकारी होऊ शकतो. या राजयोगाच्या शुभ प्रभावाने नोकरीमध्ये यश आणि प्रगती होऊ शकते. मन प्रसन्न राहीन. कोणत्याही मोठ्या कामात यश मिळेल. अचानक धन लाभ मिळू शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)