Guru Chandra Yuti Make Gajakesari Yog : यावर्षी शारदीय नवरात्रीचा सण ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू होईल. या नऊ दिवसांच्या उत्सवात देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीदरम्यान गुरू व चंद्राच्या विशेष स्थितीमुळे गजकेसरी योग तयार होतो आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा योग शुभ परिणाम देणारा मानला जातो. नवरात्रीदरम्यान तयार होणारा हा योग व्यक्तीच्या करिअर, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक जीवन, नातेसंबंधांवर परिणाम करतो असे मानले जाते. पण, त्याचा प्रत्यक्ष परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार बदलू शकतो. चला तर मग, शारदीय नवरात्रीदरम्यान तयार होणाऱ्या या योगाचा १२ राशींवर काय परिणाम होईल जाणून घेऊया.
नवरात्री कधी सुरू होईल?
पंचांगानुसार, शारदीय नवरात्री रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू होईल. या दिवशी घटस्थापनेने देवी दुर्गेच्या पूजेला सुरुवात होईल. १९ ऑक्टोबर रोजी महानवमीने नवरात्रीची सांगता होईल, तर २० ऑक्टोबर २०२६ रोजी विजयादशमी, म्हणजेच दसरा साजरा केला जाईल. या नऊ दिवसांमध्ये, भक्त देवी दुर्गाच्या विविध रूपांची पूजा करतात आणि उपवास आणि कन्या पूजन यांसारखे धार्मिक विधी सुद्धा करतात.
गजकेसरी योग म्हणजे काय?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी योग हा गुरु आणि चंद्राच्या विशिष्ट स्थितीशी संबंधित आहे. सामान्यतः जेव्हा गुरु व चंद्र केंद्रस्थानी, म्हणजेच पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या स्थानात स्थित असतात, तेव्हा हा योग तयार होतो असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, गजकेसरी योग ज्ञान, प्रतिष्ठा, आत्मविश्वास आणि आर्थिक प्रगतीशी संबंधित आहे. नवरात्रीसारख्या धार्मिक सणांच्या वेळी या योगाला विशेष महत्त्व दिले जाते.
मेष
नवरात्रीचा हा काळ करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असू शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. तुमच्यात पूर्वीसारखी ऊर्जा आणि आत्मविश्वास देखील जाणवू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची भावना वाढेल.
वृषभ
या काळात आर्थिक दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू शकतात. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात परस्पर सहकार्य आणि सुसंवाद वाढू शकतो. तुमच्यासाठी आहार व दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल.
मिथुन
यादरम्यान नवीन प्रकल्प आणि प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात. कामाबद्दलचा उत्साह वाढेल, मानसिक ताण कमी होऊ शकतो. वैयक्तिक संबंधांमध्ये विश्वास दृढ करण्याची संधी मिळेल.
कर्क
आदर आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने हा काळ चांगला मानला जातो. करिअरमध्ये ओळख वाढू शकते, वैयक्तिक जीवनात महत्त्वपूर्ण बदल दिसू शकतात. विवाहयोग्य व्यक्तींसाठी, नातेसंबंधांची चर्चा पुढे जाऊ शकते.
सिंह
तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. काही जुन्या कामातून नफा मिळण्याची शक्यता देखील आहे. पण, बदलत्या ऋतूंमध्ये आपल्या दैनंदिन दिनचर्या आणि खाण्याच्या सवयींची काळजी घेणे चांगले राहील. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर सहलीचे नियोजन करू शकता किंवा एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक बाबतीत महत्त्वपूर्ण ठरू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची अपेक्षा आहे. तुमच्या कामात प्रगती करण्यासाठी तुमच्या जोडीदाराचा किंवा जवळच्या मित्राचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो.
तूळ
तूळ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. तुमच्या वैयक्तिक जीवनातही सकारात्मक बदलांची अपेक्षा आहे आणि तुमच्या प्रेमसंबंधात एक नवीन वळण येऊ शकते.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याची संधी मिळेल, परंतु वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे असेल. नात्यातील कोणताही गैरसमज संवादातून सोडवला जाऊ शकतो.
धनु
या काळात धनु राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. त्यांना त्यांचे शिक्षण, करिअर आणि वैयक्तिक योजनांमध्ये प्रगती करण्याच्या संधी मिळू शकतात. तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनातही सकारात्मक वातावरणाची अपेक्षा आहे.
मकर
मालमत्ता आणि कौटुंबिक बाबींमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. जमीन किंवा घर खरेदी करण्याची योजना पुढे सरकू शकते. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. काही शारीरिक त्रास जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ
तुम्हाला करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. या परिस्थितीमुळे शिकण्याची आणि प्रगतीची संधी मिळेल. तुमच्या दैनंदिन कामाबरोबर तुमच्या दिनचर्येत संतुलन राखणे महत्त्वाचे असेल. नात्यांमधील मोकळ्या संवादामुळे परस्पर सामंजस्य वाढू शकते.
मीन
तुमच्यासाठी हा काळ ज्ञान आणि आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची आणि तुमच्या क्षमता वाढवण्याची संधी मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. प्रेम व कौटुंबिक संबंधांमध्ये मानसिक समाधान मिळण्याचीही शक्यता आहे.
