Guru Gochar 2 June 2026 : ज्योतिषशास्त्रात नवग्रहांचे फार महत्व असते. आपल्या कुंडलीत ग्रहांची स्थिती काय आहे यावरून त्याचा शुभ व अशुभ परिणाम आपल्याला पहायला मिळतो. ग्रहांची चाल आपल्या आयुष्यावर देखील परिणाम करते. गुरु बृहस्पतीचे गोचर हे सर्वच राशींसाठी शुभ मानले जाते. गुरु हा सुख, सौभाग्य,यश , धन, वैभव व बुद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्या राशीत गुरुची स्थिती मजबूत होईल त्या राशीला सुख- समृद्धी व धनप्राप्ती होण्याची संधी असते असे मानले जाते. ज्योतिष अभ्यासक सांगतात की, देवांचा गुरू असलेल्या गुरूचे गोचर आज २ जून रोजी मिथुन राशीत होणार आहे.

या गोचराचा परिणाम सर्व १२ राशींवर होणार असला तरी, एक राशी अशी आहे जिच्यासाठी हा गोचर रामबाण उपाय ठरणार आहे. ही राशी शनीच्या साडेसातीच्या सर्वात वेदनादायी टप्प्यातून जात आहे. आता तुमच्या लक्षात आले असेल की, आपण मीन राशीबद्दल बोलत आहोत. चला तर मग जाणून घेऊया की गुरूचे गोचर मीन राशीला दुःखाचा काळ घेऊन येणार की सुखाचा?

गुरूचे गोचर मीन राशीला वाचवणार…

मीन रास शनीच्या साडेसातीच्या सर्वात वेदनादायी टप्प्यातून जात आहे. यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत, २ जून रोजी होणारे गुरूचे गोचर तुम्हाला मोठा दिलासा देईल. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, त्या हळूहळू कमी होऊ लागतील. गुरूचे गोचर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहे आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला सुवर्ण यश मिळवून देईल. या काळात तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल. तुमच्या कर्जाचा बोजा कमी होईल, गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील, एखादा मोठा व्यावसायिक करार निश्चित होऊ शकतो. तुमच्या आरोग्यातही सुधारणा होऊ लागेल.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)