Transit of Jupiter 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रह (Jupiter) हा सुख, सौभाग्य, वैवाहिक जीवन आणि ज्ञान यांचा कारक मानला जातो. गुरू ग्रहाचे राशीपरिवर्तन हा अत्यंत महत्त्वाचा मानले जाते. कारण गुरूची चाल बदलली की त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर काही ना काही प्रमाणात होत असतो.
ज्योतिषांच्या मते, २०२६ या वर्षात गुरू ग्रह दोन वेळा राशी बदलणार (Double Transit of Jupiter) असल्याने काही राशींसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. विशेषतः ४ राशींच्या लोकांच्या जीवनात या काळात आर्थिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर सकारात्मक बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुरू ग्रह कधी-कधी बदलणार राशी? (When will Jupiter Transit in 2026?)
पहिला गोचर (First Transit):
२ जून २०२६ रोजी गुरू ग्रह कर्क राशीत (Cancer) प्रवेश करेल.
दुसरा गोचर (Second Transit):
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुरू ग्रह सिंह राशीत (Leo) प्रवेश करेल.
या दोन महत्त्वाच्या गोचरांमुळे काही राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मेष राशी (Aries): आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा
गुरूच्या या दुहेरी गोचराचा मेष राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. या काळात जुन्या कर्जातून मुक्त होण्याची शक्यता निर्माण होईल. अचानक धनलाभ होण्याचे योग जुळून येऊ शकतात. तसेच, दीर्घकाळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर या काळात चांगल्या पगाराच्या संधी मिळू शकतात. एकूणच आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.
मिथुन राशी (Gemini): आत्मविश्वास वाढणार, मोठ्या संधी मिळणार
मिथुन राशीसाठी हा गोचर लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि व्यवसाय करणाऱ्यांना मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. तसेच विवाहयोग जुळण्याची शक्यता असून घर किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
सिंह राशी (Leo): कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक मानला जात आहे. या काळात कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. केलेल्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. विदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल, तर या काळात त्या दिशेने सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. तसेच घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.
धनु राशी (Sagittarius): सुख-सुविधांमध्ये वाढ, शुभ वार्ता मिळण्याचे योग
धनु राशीसाठी हा गोचर सुखद ठरू शकतो. या काळात घरात शुभकार्य होण्याची शक्यता आहे. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत असून व्यवसाय करणाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. एकूणच जीवनमान सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टीप -वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.
