Guru Transit: वैदिक ज्योतिषात गुरु ग्रहाला ज्ञान, शिक्षक, मुलं, मोठे भाऊ, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थळे, धन, दान, पुण्य आणि प्रगती यांचा कारक मानले जाते.

गुरु ग्रह साधारणपणे दर १३ महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सध्या गुरु ग्रह मिथुन राशीत वक्री गतीने चालत आहे आणि मार्च महिन्यात तो मार्गी होणार आहे. यामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. या राशींशी संबंधित लोकांना नवीन नोकरी मिळण्याचे आणि उत्पन्नात मोठी वाढ होण्याचे योग आहेत. चला तर मग जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

मिथुन राशी (Gemini Horoscope)

तुमच्यासाठी गुरु ग्रहाचा प्रभाव सकारात्मक ठरू शकतो. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीपासून लग्न स्थानात सरळ गतीने चालणार आहे. यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. नवीन लोकांशी ओळख होण्याच्या संधी मिळतील, त्यामुळे तुमचा सामाजिक संपर्क वाढेल.

या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तसेच या वेळेत तुम्ही अधिक लोकप्रिय व्हाल. गुरुच्या प्रभावामुळे अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येण्याचीही शक्यता आहे.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

गुरु ग्रहाची सरळ चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीपासून धन आणि वाणीच्या स्थानात मार्गी होणार आहे.

यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल, त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. या काळात वाहन आणि भौतिक सोयी-सुविधांशी संबंधित गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो. तसेच वडिलोपार्जित संपत्ती किंवा जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी कुटुंबातील लोकांशी तुमचे संबंध मजबूत राहतील. तसेच या काळात उत्पन्नाचे नवीन मार्गही तयार होऊ शकतात.

तूळ राशी (Libra Horoscope)

तुमच्यासाठी गुरु ग्रहाचे मार्गी होणे शुभ आणि फायदेशीर ठरू शकते. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीपासून नवव्या भावात मार्गी होणार आहे. या ठिकाणी गुरु ग्रह मजबूत स्थितीत असतो. म्हणून या काळात तुमच्या कामांमध्ये नशिबाची साथ मिळू शकते.

तसेच देश-विदेश प्रवासाचे योग बनू शकतात. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)