Hans Mahapurush Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करतात. त्यामुळे शुभ आणि राजयोग निर्माण होतो. त्याचा मानवी जीवनावर आणि जगावर थेट परिणाम होतो. शिवाय, हा बदल काहींसाठी शुभ तर इतरांसाठी अशुभ असतो. भविष्य पंचांगानुसार, गुरू २ एप्रिल रोजी त्याच्या उच्च राशी, कर्क राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मालव्य महापुरूष राजयोग निर्माण होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. याला पंचमहापुरूषांपैकी एक मानले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग असतो, ती व्यक्ती आकर्षक, धार्मिक आणि ज्ञानी बनते. अशा व्यक्ती न्यायप्रिय, दयाळू आणि समाजात आदरणीय असतात. त्यांना जीवनात चांगल्या संधी मिळतात, त्यामुळे त्यांना उच्च पदे, संपत्ती आणि सुखसोयी प्राप्त होतात. तसंच त्यांच्या निर्णयक्षमतेचा विकास होतो. भविष्य पंचांगानुसार, २ जून रोजी गुरू ग्रह त्याच्या उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश करेल, त्यामुळे हंस महापुरूष राजयोग निर्माण होईल. गुरू कर्क राशीत उच्च होतो, त्यामुळे अत्यंत शुभ फळे मिळतात.

हंस महापुरूष राजयोग कसा तयार होतो?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, हा राजयोग तेव्हा तयार होतो जेव्हा गुरू जन्मपत्रिकेतील केंद्रस्थानी असलेल्या घरांमध्ये म्हणजेच लग्न (पहिले), चतुर्थ, सप्तम किंवा दशम घरात आणि त्याचबरोबर स्वत:च्या स्वराशीत (धनु किंवा मीन) उच्च राशीत (कर्क) असतो. अशा परिस्थितीत गुरू अत्यंत बलवान बनतो आणि त्याचा शुभ प्रभाव अनेक पटींनी वाढतो.

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे गोचर चौथ्या घरात होईल, जे सुख आणि संपत्तीचे घर मानले जाते. हंस महापुरूष राजयोगाच्या प्रभावामुळे कौटुंबिक सुखात वाढ होऊ शकते, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळू शकते आणि तुम्हाला तुमच्या आईकडून पाठिंबा मिळेल. मानसिक शांती तुमच्या जीवनात स्थिरता आणेल आणि कौटुंबिक जीवन समृद्ध होऊ शकते.

वृषभ राशी

वृषभ राशीसाठी गुरू तिसऱ्या घरात भ्रमण करत आहे. हे घर धैर्य, शौर्य आणि संवाद यांच्याशी संबंधित आहे. या युतीमुळे आत्मविश्वास वाढण्याची, नवीन प्रकल्पांना यश मिळण्याची आणि धाकट्या भावंडांकडून पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नवीन उपक्रम हाती घेण्याचे धैर्य तुम्हाला मिळेल.

मिथुन राशी

मिथुन राशीसाठी गुरू दुसऱ्या घरात भ्रमण करत आहे, ते धन आणि वाणीचे घर आहे. हंस राजयोगाच्या प्रभावामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त पैशाची बचत होऊ शकते आणि कुटुंबात शांतता आणि आनंद नांदू शकेल. तुमची वाणी प्रभावी होईल, त्यामुळे तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात फायदा होऊ शकतो.

कर्क राशी

कर्क राशीसाठी गुरूचे गोचर पहिल्या घरात म्हणजेच लग्न स्थानात होत आहे. ते या राजयोगासाठी सर्वात शक्तिशाली स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होऊ शकते. तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो आणि जीवनात महत्त्वपूर्ण संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचा सामाजिक दर्जा वाढू शकतो आणि तुमची निर्णयक्षमता अधिक मजबूत होईल.

सिंह राशी

सिंह राशीसाठी गुरू बाराव्या घरात भ्रमण करत आहे. या काळात खर्च वाढू शकतो. मात्र, हंस महापुरूष योगाच्या निर्मितीमुळे आध्यात्मिक प्रगती आणि परदेश यात्रा होऊ शकते. तुमच्या जीवनात आत्मपरीक्षण आणि मानसिक संतुलन देखील वाढू शकते.

कन्या राशी

कन्या राशीसाठी गुरू अकराव्या घरात भ्रमण करत आहे. ते लाभ आणि उत्पन्नाचे घर आहे. त्यामुळे या राजयोगाच्या प्रभावाखाली उत्पन्नाचे नवीन स्त्रोत, इच्छापूर्ती आणि मित्र, ओळखीच्या लोकांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक बळकटी मिळण्याचीही शक्यता आहे.

तूळ राशी

तूळ राशीसाठी गुरू दहाव्या घरात म्हणजेच कर्माच्या घरात भ्रमण करत आहे. या स्थितीमुळे हंस महापुरूष राजयोग अत्यंत प्रभावी बनतो. त्यामुळे या काळात करिअरमध्ये प्रगती, बढती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तसंच सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचेही प्रबळ संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख अधिक दृढ होईल.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीसाठी गुरू नवव्या घरात भ्रमण करत आहे, ते भआग्य आणि धर्माचे घर आहे. या युतीमुळे भाग्य, धार्मिक कार्यांमध्ये वाढलेली रूची आणि लांबच्या प्रवासाची शक्यता मिळू शकते. हा काळ जीवनात सकारात्मक बदल आणि मार्गदर्शन देखील घेऊन येईल.

धनु राशी

धनु राशीसाठी गुरू आठव्या घरात भ्रमण करत आहे. हंस राजयोगाच्या प्रभावामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. गूढ ज्ञान आणि संशोधनातील आवड वाढू शकते. मात्र, काही चढ-उतार देखील शक्य आहेत. संयम आणि समजूतदारपणा फायदेशीर ठरेल.

मकर राशी

मकर राशीसाठी गुरू सातव्या घरातून विवाह आणि भागीदारीच्या घरातून भ्रमण करत आहे. हंस महापुरूष राजयोगाची बलवान स्थिती सातव्या घरात असल्याचे मानले जाते. त्यामुळे वैवाहिक जीवन अधिक सुखकर होण्याची चिन्हे आहेत. याव्यतिरिक्त व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरण्याची आणि सामाजिक संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.

कुंभ राशी

कुंभ राशीसाठी गुरू सहाव्या घरात भ्रमण करत आहे. या युतीमुळे शत्रूंवर विजय मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे आणि कामाच्या ठिकाणी प्रगतीला चालना मिळू शकते. तसंच आरोग्याबाबत काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मीन राशी

मीन राशीसाठी गुरू पाचव्या घरात भ्रमण करत आहे. हे घर शिक्षण, संतती आणि प्रेम यांचे प्रतिनिधित्व करते. हंस महापुरूष राजयोगाच्या प्रभावामुळे शिक्षणात यश, संततीचे सुख आणि सृजनशील कार्यांमध्ये प्रगती होऊ शकते. प्रेमसंबंधही अधिक दृढ होतील. ज्या जोडप्यांना संततीची इच्छा आहे, त्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकते.