Guru Gochar In 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरु सध्या मिथुन राशीत विराजमान असून तो जूनपर्यंत याच राशी राहणार आहे.
पंचांगानुसार, गुरू ०२ मे २०२६ रोजी मिथुन राशीतून मध्यरात्री ०२ वाजून २५ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच तो ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. कर्क ही गुरूची उच्च रास असल्याने हंस महापुरूष राजयोग निर्माण होईल. हा योग १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी अनुकुल सिद्ध होईल.
गुरूचे गोचर ‘या’ राशींना मालामाल करणार
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल.
मीन (Meen Rashi)
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल.
कन्या (Kanya Rashi)
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे गोचर अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. मनासारखा जोडीदार भेटेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
