Guru Gochar: गुरु ग्रह ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी, शनिवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. गुरु ग्रहाच्या या राशीबदलाचा काही राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे. या राशींना नशिबाची साथ मिळेल. तसेच सुख, समृद्धी आणि यश मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल.

मेष राशी (Aries Zodiac Sign)

मेष राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळू शकते. अनेक कामांचे निकाल तुमच्या बाजूने लागू शकतात. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तसेच सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते.

कर्क राशी (Cancer Zodiac Sign)

कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला राहू शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कामात यश मिळेल. तसेच अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशी (Leo Zodiac Sign)

गुरु ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार असल्यामुळे या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या चांगल्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक राहील. कोणतेही काम नियोजन करून केल्यास त्याचा अधिक फायदा होईल.

तूळ राशी (Libra Zodiac Sign)

गुरु ग्रहाचा सिंह राशीतील प्रवेश तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांची कामगिरीही चांगली राहू शकते.

कुंभ राशी (Aquarius Zodiac Sign)

कुंभ राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक वातावरण आनंददायी राहू शकते. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणीही चांगले यश मिळू शकते. एखादा मोठा व्यवहार पूर्ण झाल्यामुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)