वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. एप्रिलमध्ये नऊ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एप्रिल महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचा आहे. १३ एप्रिल रोजी देवांचा गुरू बृहस्पती स्वतःच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या संक्रमणाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु ग्रहाचा संबंध ज्ञान, वृद्धी, शिक्षक, संतती, शिक्षण, संपत्ती, दान आणि पुण्य यांच्याशी विचारात घेतला जातो. त्यामुळे गुरूच्या राशी बदलाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण तीन राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा राशी बदल शुभ सिद्ध होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या तीन राशी…

वृषभ: तुमच्या राशीतून गुरु अकराव्या स्थानात प्रवेश करेल. या स्थानाला लाभ आणि उत्पन्नाचे स्थान म्हटलं जातं. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नवीन व्यवसाय करार निश्चित होऊ शकतो. या कराराचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. या काळात तुमची कार्यशैली देखील सुधारेल, ज्यामुळे तुमचा बॉस तुमच्यावर खूश असेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. जे मीडिया किंवा चित्रपटसृष्टी, फॅशन डिझायनिंगशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे.

Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी
Loksatta kutuhal The technology behind perfect intelligence
कुतूहल: परिपूर्ण बुद्धिमत्तेमागील तंत्रज्ञान

मिथुन: गुरूचे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या दहाव्या घरात गुरुचे संक्रमण होणार आहे. या स्थानाला करिअर आणि नोकरीचं स्थान म्हणतात. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात आणि व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. दुसरीकडे, जे मार्केटिंग, वकील आणि मीडिया या क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार गुरु आणि बुध ग्रह यांच्यात मैत्रीचं नातं आहे. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.

Budh Uday: अस्ताला गेलेल्या बुध ग्रहाचा होणार उदय, १२ एप्रिलपासून ‘या’ राशींवर असेल कृपा

कर्क: या राशीच्या लोकांसाठी १३ एप्रिलपासून चांगले दिवस येतील. कारण तुमच्या नवव्या भावात गुरु ग्रहाचे भ्रमण असेल. हे स्थान भाग्य आणि परदेश प्रवासाचे स्थान आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यासोबतच रखडलेली कामेही होतील. ज्या लोकांचा व्यवसाय खाद्यपदार्थ, हॉटेल, रेस्टॉरंटशी संबंधित आहे, अशा लोकांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे.