Guru Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरु सध्या वृषभ राशीत विराजमान असून तो मेपर्यंत याच राशी राहणार आहे. तसेच तो १५ मे २०२५ रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये कर्क राशीत आणि वर्षाच्या शेवटी पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करेल. इतकंच नव्हे तर गुरू राशी परिवर्तनासह या वर्षी तीन वेळा नक्षत्र परिवर्तनही करणार आहे.

पंचांगानुसार, देवगुरू १९ ऑगस्ट २०२६ रोजी पुष्य नक्षत्रातून अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. देवगुरूचे अश्लेषा नक्षत्रातील गोचर १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी नक्कीच अनुकूल सिद्ध होईल.

गुरूचे राशी परिवर्तन ‘या’ राशींना मालामाल करणार

कर्क (Kark Rashi)

गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.

कन्या (Kanya Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या लोकांना गुरूच्या गोचराने नशीबाची साथ लाभेल. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळू शकतो. नवीन आर्थिक योजना लाभदायक ठरू शकतात. घरात सुख-समृद्धीचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य पूर्वीपेक्षा सुधारेल.

मकर (Makar Rashi)

देवगुरूच्या गोचरामुळे मकर राशीच्या व्यक्तींना करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळू शकतात. नोकरीत पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा आणि नवीन संधी मिळू शकतात. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होण्याबरोबरच उत्पन्नाचे नवीन मार्गही खुलू शकतात.

मीन (Meen Rashi)

देवगुरूच्या राशी परिवर्तनाने मीन राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये वरिष्ठांकडून कौतुक आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना मोठे व्यवहार पूर्ण करण्यात यश मिळू शकते. गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याचे संकेत आहेत. अडकलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना स्वतःच्या परिस्थितीचा विचार करूनच पुढे जा.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)