Guru Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिष्यशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं. गुरुला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे एक वर्ष लागते. या स्थितीत पुन्हा एका राशीत येण्यासाठी १२ वर्षे लागतात. अशा स्थितीत गुरु ग्रह अस्त आणि वक्री अवस्थेत जातो.

पंचांगानुसार, जर गुरू ग्रह तुमच्यावर प्रसन्न असेल, तर तुमच्या जीवनात आनंद टिकून राहतो. याशिवाय, गुरू ग्रह शिक्षण, संतती, ज्ञान आणि संपत्तीचा कारक मानला जातो. सध्या, गुरू चंद्राची राशी असलेल्या कर्क राशीत आहे. गुरू पुढील महिनाभर याच राशीत राहील. गुरूचे चंद्राच्या राशीतील संक्रमण काही राशींना लाभ मिळवून देईल, तर इतरांना कठीण काळाला सामोरे जावे लागेल. हिंदू पंचांगानुसार, गुरू ३१ ऑक्टोबरपर्यंत कर्क राशीत राहील.

गुरूचे गोचर नशीब चमकवणार

कर्क (Kark Rashi)

गुरूचे गोचर कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

सिंह (Singh Rashi)

गुरूचे गोचर सिंह राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे गोचर लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

मिथुन (Mithun Rashi)

गुरू गोचरामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहू शकते. गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेताना मात्र योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरूचे गोचर करिअर आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचे ठरू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तसेच वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक लाभाचे मार्ग खुले होऊ शकतात. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल जाणवू शकतात.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या लोकांसाठी गुरूचे गोचर भाग्याची साथ देणारे ठरू शकते. शिक्षण, करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. परदेशाशी संबंधित कामे किंवा प्रवासाच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाच्या कामांमध्ये योग्य व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)