Guru Vakri 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. येणाऱ्या नवीन वर्षातही गुरूचे राशी, नक्षत्र परिवर्तन होईल शिवाय या काळात गुरू वक्री, अस्त आणि मार्गी होईल ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर विशेष प्रभाव देईल.
पंचांगानुसार, गुरू ११ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजून ११ मिनिटांनी राशीत वक्री झाला असून सध्या गुरू याच स्थितीत आहे. ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ०८ वाजून ५८ मिनिटांनी मार्गी होईल. तसेच १३ डिसेंबर २०२६ रोजी पहाटे ०६ वाजून २५ मिनिटांनी पुन्हा वक्री होईल आणि १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०७ वाजून ४० मिनिटांनी मार्गी होईल. गुरूची दोन वेळा होणारी वक्री चाल १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
गुरूची वक्री चाल ‘या’ राशींवर धनवर्षा करणार
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या व्यक्तींसाठी गुरूची वक्री स्थिती खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल.
वृषभ (Vrushabh Rashi)
गुरू ग्रहाची वक्री स्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
मेष (Mesh Rashi)
गुरू ग्रहाच्या वक्री स्थितीचा मेष राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.
कन्या (Kanya Rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी गुरूची वक्री अवस्था लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

