Guru Asta In Kark Rashi : सध्या देवगुरू बृहस्पती कर्क राशीत अस्त अवस्थेत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, ९ ऑगस्ट २०२६ पर्यंत याच अवस्थेत राहणार आहेत. अशी मान्यता आहे की, एखादा शुभ ग्रह अस्त झाल्यावर त्याचा शुभ प्रभाव काही प्रमाणात कमी होतो. त्यामुळे या काळात त्या ग्रहाकडून मिळणारे सकारात्मक परिणाम अपेक्षेपेक्षा कमी जाणवू शकतात. गुरू केवळ अस्त अवस्थेत नाही तर अत्यंत वेगाने गोचरही करत असल्यामुळे, त्याचे शुभ परिणाम सामान्यपेक्षा कमी मानले जात आहेत.

गुरूच्या या स्थितीचा अनेक राशींच्या नशिबावर परिणाम होऊ शकतो. शिवाय, लोकांना आर्थिक लाभात अडथळे, करिअर, व्यवसायात मंद प्रगती, वैवाहिक जीवन, शिक्षण, गुंतवणुकीत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया की, ९ ऑगस्टपर्यंत कोणत्या राशींना विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

कर्क

देवगुरू तुमच्या राशीत अस्त स्थितीत आहे. परिणामी तुम्हाला व्यवसाय, करिअरच्या बाबतीत अपेक्षित परिणाम मिळण्यास विलंब होऊ शकतो. तुम्हाला एखादी काही वाईट बातमी मिळू शकते. तुम्हाला व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो. नवीन गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या आरोग्याबाबतही निष्काळजी राहू नका.

कन्या

गुरूच्या अस्त स्थितीमुळे तुम्हाला भाग्याची कमी साथ लाभू शकते. तुम्हाला कामात अधिक मेहनत करावी लागेल. आर्थिक बाबतीत जोखीम घेणे टाळा. धार्मिक यात्रांमध्ये अडथळा येऊ शकतो. कोणतेही शुभ कार्य न करणे उत्तम. कोणतीही महत्त्वाची योजना अंतिम करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कामाशी संबंधित मानसिक ताण वाढू शकतो.

मकर

गुरूच्या या स्थितीमुळे तुमच्या वैवाहिक व भागीदारीच्या बाबींवर परिणाम होऊ शकतो. काही कारणांमुळे विवाहयोग्य संबंधांना विलंब होऊ शकतो किंवा त्यात अडथळा येऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात काही अडचणी येतील. करिअरसंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे उत्तम राहील. तुम्हाला अनेक कामांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. अगदी थोडासा निष्काळजीपणासुद्धा तुमचे काम खराब करू शकतो.

(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)