Guru Gochar 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रहांचे राशी बदल विशेष मानले जातात. कारण त्यांचा प्रभाव मेष ते मीन राशींच्या जीवनात दिसून येतो. पण, प्रत्येक ग्रहाचे गोचर वेगवेगळ्या राशींसाठी शुभ किंवा अशुभ परिणाम आणते. असे मानले जाते की, जेव्हा एखादा ग्रह त्याच्या उच्च राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्याचा शुभ प्रभाव अनेक पटींनी वाढतो आणि त्याचा फायदा होऊ शकतो.

सध्या गुरु त्याच्या उच्च राशीत, म्हणजेच कर्क राशीत आहे. गुरु ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत याच राशीत राहील. परिणामी, येणारे २० दिवस तीन राशींसाठी विशेष आणि फायदेशीर ठरू शकतात. या काळात त्यांना व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये लाभ मिळू शकतो. चला तर या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया.

कर्क

तुमच्यासाठी हा काळ शुभ असू शकतो. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. या काळात इच्छित नोकरी तर आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. तुम्हाला व्यवहारात यश आणि मेहनतीचे फळ मिळताना दिसेल. अनेक बाबतीत सकारात्मक परिणाम दिसू शकतात. शिक्षण क्षेत्रात असलेल्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

धनु

हा काळ तुम्हाला करिअरमध्ये यश मिळवून देऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळू शकतात. या काळात दीर्घकाळच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे. व्यवसायात असलेल्यांना नफ्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगतीचे नवीन मार्गही खुले होऊ शकतात. व्यवहारांशी संबंधित काही जुने प्रश्न सुटतील, जीवनात सकारात्मकता वाढेल आणि या काळात तुम्हाला काही महत्त्वाची बातमी सुद्धा मिळू शकते.

कुंभ

तुमच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा आणखीन चांगली होईल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये दिलासा मिळू शकतो आणि उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. कुटुंबात आनंद नांदेल, तुमच्या आयुष्यात एक जवळचा मित्र येईल. नोकरी करणाऱ्यांना एक मोठा करारही मिळू शकतो. तसेच या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल आमो तुमचा व्यवसाय यशस्वी होईल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)