Guru Nakshatra Gochar 2026: ज्योतिष्यशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं. गुरुला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे एक वर्ष लागते. या स्थितीत पुन्हा एका राशीत येण्यासाठी १२ वर्षे लागतात. अशा स्थितीत गुरु ग्रह अस्त आणि वक्री अवस्थेत जातो. सध्या गुरू मिथुन राशीत असून तो २ जून २०२६ रोजी तो कर्क राशीत प्रवेश करेल. शिवाय गुरू २०२६ मध्ये तीन वेळा नक्षत्र गोचरही करेल.
पंचांगानुसार, सध्या गुरू पुनर्वसु नक्षत्रात असून तो १८ जून २०२६ रोजी पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. १९ ऑगस्ट रोजी अश्लेषा नक्षत्रात आणि ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी तो मघा नक्षत्रात प्रवेश करेल. गुरूचे हे नक्षत्र गोचर नक्कीच काही राशींसाठी लाभदायी सिद्ध होईल.
गुरुचे नक्षत्र परिवर्तन मालमाल करणार
मीन (Meen Rashi)
गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाचा अत्यंत शुभ परिणाम मीन राशीच्या लोकांना मिळू शकतो. या राशीचे लोक करिअरमध्ये भाग्यवान ठरु शकतात. पदोन्नतीत विशेष लाभ मिळू शकतो. तुम्हाला परदेशात काम करण्याची संधीही मिळू शकते. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.
धनु (Dhanu Rashi)
गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाचा शुभ प्रभाव धनु राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. तुम्ही या काळात काही मोठा निर्णय घेऊ शकता. त्याचा भविष्यात भरपूर लाभ मिळू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. त्याचबरोबर परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात गुरूच्या कृपेने सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवनात फायदा होऊ शकतो. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. अधिकाधिक पैसे कमवू शकाल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. स्पर्धा परिक्षेत मनासारखे यश मिळेल. घरात सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

