Guru Nakshatra Transit 2024: ज्योतिष शास्त्रात, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो. वैभव, ऐश्वर्य, सुख, समृद्धी आणि ज्ञानाचा कारक मानल्या जाणाऱ्या गुरूच्या हालचालीत बदल होतो तेव्हा देश आणि जगावरही त्याचा परिणाम दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. सुख, संपत्ती, वैभव, ऐषाराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरूचा राशी बदल अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरतो. सध्या देवगुरु वृषभ राशीत आहे आणि ३१ जुलै रोजी बृहस्पति नक्षत्र बदलून रोहिणी नक्षत्राच्या चौथ्या भावात प्रवेश करतील. १९ ऑगस्टपर्यंत ते याच स्थितीत राहतील. त्यामुळे काही राशींना आयुष्यात अपार यश, सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया या नशिबान राशी कोणत्या… 'या' राशीच्या लोकांना होऊ शकतो मोठा धनलाभ मेष राशी मेष राशीच्या मंडळींना देवगुरुच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मोठा फायदा होऊ शकतो. या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतात यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात या लोकांना खूप चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वृषभ राशी देवगुरुच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या मंडळींना अनपेक्षित पैसे मिळू शकतात. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते पूर्ण होऊ शकते. व्यापारी आणि नोकरदारांना खूप फायदा होऊ शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. समाजात मान सन्मान वाढू शकतो. (हे ही वाचा : २९३ दिवस बक्कळ पैसा! ‘या’ राशींवर असणार देवगुरुचा वरदहस्त; देवी लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत ) कर्क राशी कर्क राशीच्या लोकांना देवगुरुच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पैसा आणि आर्थिक बाबतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी ठरु शकते. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात नवीन घर-कार खरेदी करु शकता. सिंह राशी देवगुरुच्या नक्षत्र परिवर्तनामुळे सिंह राशीच्या मंडळींना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय भाग्यशाली ठरु शकते. तुम्हाला मोठी डील मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती आणि वाढ होण्याची शक्यता आहे. या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. कन्या राशी कन्या राशीच्या लोकांना देवगुरुच्या कृपेने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या काळात तुम्हाला पैसे कमवण्यासाठी अधिक संधी मिळू शकतात. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)