Guru Nakshatra Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनाबरोबर नक्षत्र परिवर्तनाचा देखील अधिक प्रभाव १२ राशीच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. देवगुरू बृहस्पति सध्या रोहिणी नक्षत्रामध्ये विराजमान असून ते २० ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात विराजमान असतील. तसेच १२ वर्षांनंतर मे २०२४ रोजी गुरू ग्रहाने वृषभ राशीमध्ये प्रवेश केला होता. या राशीत देवगुरू बृहस्पति १३ मे २०२५ पर्यंत उपस्थित असतील. वृषभ राशीचा आणि रोहिणी नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळे गुरूचा शुक्राच्या नक्षत्रातील प्रवेश ३ राशीच्या व्यक्तींसाठी लाभकारी परिणाम सिद्ध होईल. या काळात या राशीच्या व्यक्तींना अनेक भौतिक सुख-सुविधा प्राप्त होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरूचे नक्षत्र परिवर्तन (Guru Nakshatra Transit 2024)

वृषभ

गुरूच्या रोहिणी नक्षत्रातील प्रवेशाने वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल, भौतिक सुखात वाढ होईल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. समाजात मानसन्मान वाढेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी गुरू ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन सिंह अनेक लाभदायी बदल घेऊन येईल. या काळात नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. नवीन संधी प्राप्त होईल.

हेही वाचा: पैसाच पैसा! राहू-शनीचा प्रभाव ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार यश, कीर्ती अन् बक्कळ पैसा

धनु

गुरूच्या रोहिणी नक्षत्रातील प्रवेशाने धनु राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru nakshatra transit 24 until august effect of rohini nakshatra transformation guru will give money love fame sap
Show comments