Jupiter Nakshatra Transit: वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु बृहस्पतीला ज्ञान, भाग्य, धर्म, विवाह आणि संततीचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे गुरुच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलाचा परिणाम अनेक राशींवर पाहायला मिळतो. सध्या गुरु बृहस्पती कर्क राशीत असून अश्लेषा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात आहेत. आता ८ ऑक्टोबरला गुरु अश्लेषा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुच्या नक्षत्र चरणातील हा बदल काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. या काळात निर्णय घेताना संभ्रम निर्माण होणे, कामांमध्ये अडथळे येणे आणि महत्त्वाच्या योजनांना विलंब होण्याची शक्यता आहे. वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे मानसिक ताण जाणवू शकतो. तसेच आर्थिक व्यवहार करताना विशेष सावध राहणे गरजेचे ठरेल.
कोणत्या राशींनी अधिक सावध राहावे?
मिथुन राशी
गुरुचा नक्षत्र चरणातील बदल मिथुन राशीच्या जातकांसाठी काहीसा त्रासदायक ठरू शकतो. नोकरी किंवा कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठांशी एखाद्या मुद्द्यावर मतभेद होण्याची शक्यता आहे. जबाबदाऱ्या वाढल्यामुळे मानसिक दबाव जाणवू शकतो. सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास कामाचा वेग मंदावू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन संधी स्वीकारताना घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कुटुंबातील काही विषयांवरून मतभेद होऊ शकतात. जोडीदारासोबत किरकोळ कारणांवरून वाद वाढण्याची शक्यता असल्याने संवादातून परिस्थिती हाताळणे फायदेशीर ठरेल.
सिंह राशी
सिंह राशीसाठीही हा काळ काही आव्हाने घेऊन येऊ शकतो. आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटू शकतो आणि मनातील विचार स्पष्टपणे मांडताना अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी निर्णय घेण्याचा दबाव वाढू शकतो. या काळात अपेक्षेप्रमाणे नशीब साथ देत नसल्याची भावना निर्माण होऊ शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. पार्टनरसोबत जुन्या वादांना पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्येही गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणताही निष्कर्ष घाईने काढण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीशी मोकळेपणाने संवाद साधणे महत्त्वाचे ठरेल.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी गुरुचा हा नक्षत्र बदल काही बाबतीत अडचणी वाढवणारा ठरू शकतो. अविवाहित व्यक्तींच्या विवाहाच्या चर्चांना विलंब होण्याची शक्यता आहे. काही चांगले प्रस्ताव शेवटच्या क्षणी हातातून निसटू शकतात. विवाहित व्यक्तींमध्ये छोट्या-छोट्या कारणांवरून तणाव निर्माण होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांवर कामाचा दबाव वाढू शकतो. भरपूर मेहनत करूनही अपेक्षित परिणाम न मिळाल्याने निराशा जाणवण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे रखडू शकतात आणि नवीन जबाबदाऱ्या अंगावर येऊ शकतात.
आर्थिक बाबतीतही सावध राहा!
गुरुच्या नक्षत्र चरणातील या बदलादरम्यान अनावश्यक खर्च, घाईघाईने केलेली गुंतवणूक किंवा विचार न करता घेतलेले आर्थिक निर्णय टाळणे फायदेशीर ठरू शकते. कोणतीही मोठी आर्थिक योजना करण्यापूर्वी तिचा नीट विचार करणे आवश्यक आहे.
