Guru Purnima 2026 Date Rituals : प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुला एक आदराचे, महत्त्वाचे स्थान आहे. कारण गुरु हा तुमच्या जीवनाचा मार्गदर्शक असतो. आई – वडिलांनंतर गुरूचं आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम करतो. यामुळे हिंदू धर्मात गुरुला देवासमान स्थान आहे. दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरु प्रति सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करतो. पण यंदा गुरु पौर्णिमा कधी आहे, त्याची तारीख आणि शुभ वेळ जाणून घेऊया.

हा सण दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी, आषाढ पौर्णिमा २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांनी सुरू होईल. पौर्णिमा २९ जुलै २०२६ रोजी रात्री ८ वाजून ७ मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे, गुरुपौर्णिमा २९ जुलै रोजी साजरी केली जाईल.

धार्मिक मान्यतेनुसार, महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे, हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते. गुरु पौर्णिमा ही आषाढ महिन्याच्या समाप्तीचे आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे, जो भगवान शिवाचा अत्यंत आवडता महिना मानला जातो. गुरु पौर्णिमेला दानधर्म आणि स्नान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते.

गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त (Guru Purnima Exact Date And Shubh Muhurat)

ब्रह्म मुहूर्त – पहाटे ४.१७ ते ४.५९ पर्यंत

विजय मुहूर्त – दुपारी २.४३ ते ३.३७ पर्यंत

संध्याकाळ मुहूर्त – संध्याकाळी ७.१४ ते ८.१७

गुरुपौर्णिमेला शुभ योग (Guru Purnima Shubh Yog 2026)

जर एखादा सण शुभ योगांच्या संयोगाने साजरा होत असेल, तर त्याचे धार्मिक महत्त्व अधिकच वाढते. याच कारणामुळे यावर्षी गुरुपौर्णिमा विशेष मानली जात आहे. हिंदू पंचांगानुसार, या वेळी गुरुपौर्णिमेला प्रीती योग आणि हर्षण योग तयार होतील. हे दोन्ही योगांचा प्रभाव दिवसभर असेल, ज्योतिषशास्त्रानुसार, प्रीती योग प्रेम, सुसंवाद आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो, तर हर्षण योग यश, आनंद आणि शुभ फळे देणारा योग मानला जातो. त्यामुळे, या दिवशी योग्य विधींसह पूजा केल्याने जीवनात आनंद, शांती आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

गुरुपौर्णिमेचे महत्व (Guru Purnima 2026 Significance)

गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. वेद व्यासांनी अनेक वेद आणि पुराणे रचली होती. त्यातील वेदातून त्यांनी मानवजातीला ज्ञान दिले. त्यामुळे याला व्यास पौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करून, त्यांचे आशीर्वाद घेतात.