21st July Panchang & Rashi Bhavishya: २१ जुलै २०२४ ला आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. आजची तिथी ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. २१ जुलैला दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांपर्यंत पौर्णिमा असणार आहे. रविवारचा संपूर्ण दिवस पार करून २२ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजून १४ मिनिटांपर्यंत उत्तराषाढा नक्षत्र जागृत असणार आहे. रात्री ९ वाजून ११ मिनिटांपर्यंत विश्कम्बा योग असणार आहे. आजचे दिनविशेष पाहिल्यास आज गुरुपौर्णिमा असल्याने शिर्डी येथे विशेष उत्सव साजरा केला जात आहे. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असणार हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुपौर्णिमा विशेष: २१ जुलै पंचांग व राशी भविष्य

मेष:-बरेच दिवस राहून गेलेली गोष्ट वाचनात येईल. खर्च बेताचा ठेवावा. कामात अधिक चिकाटी ठेवावी लागेल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहण्याची शक्यता. हाती आलेली कामे पूर्ण होतील.

वृषभ:-समजून-उमजून गुंतवणूक करावी. चांगले साहित्य वाचनातून आनंद मिळेल. मन प्रसन्न राहील. जुने विचार बाजूला सारावे लागतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

मिथुन:-गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. हातातील अधिकार लक्षात घेऊन वागावे. जुनी येणी वसूल होतील. मित्रांची भेट घेणे शक्य होईल. अनामिक भीती दूर सारावी.

कर्क:-जोडीदाराशी सहमत राहावे लागेल. आरोग्याची पथ्ये पाळावीत. खोटेपणाचा आधार घेऊ नका. जबाबदारी टाळून चालणार नाही. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेदाची शक्यता.

सिंह:-आत्मविश्वास कायम ठेवावा. नोकरीतील जुनी कामे मार्गी लागतील. कामातून समाधान शोधाल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. गोड बोलून मने जिंकून घ्याल.

कन्या:-उत्तम गृहसौख्य लाभेल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करावे. झोपेची तक्रार जाणवेल. महत्त्वाच्या गोष्टींची नोंद ठेवावी. व्यावसायिक ठिकाणी आपल्या कामाशीच प्रामाणिक रहा.

तूळ:-घरातील कामात दिवस जाईल. महत्त्वाची कामे प्रलंबित पडू शकतात. जोडीदाराची इच्छा पूर्ण करावी लागेल. थोडीफार चिडचिड होण्याची शक्यता. मित्रमंडळींशी संवाद साधावा.

वृश्चिक:-उत्साह कायम ठेवावा. मनात बरेच दिवसांपासून घोळत असलेली इच्छा आमलात आणाल. अधिकारी व्यक्तीचा सल्ला मोलाचा ठरेल. पोटाची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

धनू:-आपले व्यक्तिमत्व जपण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवा. वेगळा विचार करून पाहावा. व्यापारी वर्गाला दर्जा सुधारता येईल. ज्येष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

मकर:-तुमचे मनोबल उंचावेल. जोडीदाराविषयी मनात उगाच ग्रह करून घेऊ नका. उतावीळपणा करून चालणार नाही. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. मनातील इच्छा साकारता येईल.

कुंभ:-उत्कृष्ट कलेचा अनुभव घ्याल. उतावीळपणाने वागून चालणार नाही. मन काहीसे चंचल राहील. प्रेमसंबंध सुधारतील. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल.

हे ही वाचा<< श्रावण सुरु होताच ‘या’ तीन राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार; दुःख- संकट वाटेतून होतील दूर, प्रचंड धनलाभाचा योग

मीन:-उत्साह व धडाडी योग्य कारणासाठी वापरा. चांगले मित्र ओळखा व पारखून घ्या. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. सौम्य शब्दांचा वापर करावा. घरात टापटीप ठेवाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru purnima special 21st july panchang rashi bhavishya shirdi saibaba shubh diwas 12 mesh to meen horoscope astrology today svs
Show comments