Guru Pushya Yog 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, पुष्य नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीचा जन्मदेखील याच नक्षत्रात झाला होता. गुरु हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात शुभ ग्रह आहे. पंचांगानुसार, ज्या दिवशी गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात, त्या दिवसाला ‘गुरु पुष्य योग’ किंवा ‘गुरु पुष्य अमृत योग’ म्हणतात. पंचांगानुसार, या वर्षातील तिसरा गुरु पुष्य योग १८ जून २०२६ रोजी तयार होईल, जो या वर्षातील शेवटचा ‘गुरु पुष्य योग’ असेल. हा दिवस नवीन शिक्षण, गुंतवणूक आणि करारांसाठी अत्यंत फलदायी आहे.
‘गुरु पुष्य योग’ ‘या’ राशींचे भाग्य बदलणार
मिथुन (Mithun Rashi)
‘गुरु पुष्य योग’ मिथुन राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. तुम्ही या काळात काही मोठा निर्णय घेऊ शकता. त्याचा भविष्यात भरपूर लाभ मिळू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. त्याचबरोबर परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.
मीन (Meen Rashi)
‘गुरु पुष्य योग’ अत्यंत शुभ परिणाम देणारा असेल ज्याचा मीन राशीच्या लोकांना मिळू शकतो. या राशीचे लोक करिअरमध्ये भाग्यवान ठरु शकतात. पदोन्नतीत विशेष लाभ मिळू शकतो. तुम्हाला परदेशात काम करण्याची संधीही मिळू शकते. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होईल.
कन्या (Kanya Rashi)
‘गुरु पुष्य योग’ कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवनात फायदा होऊ शकतो. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. अधिकाधिक पैसे कमवू शकाल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. आयुष्यात नवे बदल पाहायला मिळतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
