Venus-Jupiter Conjunction Gajlaxmi Rajyog June 2026: देवांचा गुरु म्हणून ओळखला जाणारा गुरु ग्रह २ जून २०२६ रोजी तब्बल १२ वर्षांनंतर स्वतःच्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत गोचर करणार आहेत. यानंतर लगेचच ८ जून रोजी सुख-समृद्धीचा कारक शुक्र देखील कर्क राशीत येईल. कर्क राशीमध्ये गुरु आणि शुक्राच्या या संयोगामुळे अत्यंत शुभ असा ‘गजलक्ष्मी राजयोग’ निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु-शुक्राची युती अतिशय शुभ आणि प्रभावशाली मानली जाते. ज्योतिषानुसार, या युतीमुळे अनेक राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि त्यांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात.
गुरु-शुक्र युतीचे काय फळ मिळते?
ज्योतिषशास्त्रात गुरू आणि शुक्राची युती ही सर्वात शुभ युतींपैकी एक मानली जाते. या युतीमुळे निर्माण होणारा गजलक्ष्मी राजयोग प्रेम, सौंदर्य, करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत अत्यंत सकारात्मक प्रभाव घेऊन येतो. तसेच ही युती आध्यात्मिक प्रगतीलाही चालना देते.
जाणून घ्या कोणत्या राशींसाठी ही युती ठरेल भाग्यवान
१. मेष राशी (Aries):
मेष राशीच्या लोकांसाठी गुरु-शुक्राची युती अत्यंत फलदायी ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग येतील आणि नोकरदार वर्गाला पदोन्नती (प्रमोशन) मिळू शकते. काही लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायातील स्थिती मजबूत होईल आणि व्यापाऱ्यांना एखादी मोठी डील मिळू शकते.
२. मिथुन राशी (Gemini):
मिथुन राशीच्या लोकांसाठी ही युती आर्थिक स्थितीत मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणेल. या काळात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. जुन्या माध्यमांतूनही धनप्राप्ती होईल. कौटुंबिक समस्या संपुष्टात येतील आणि कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळतील आणि जुन्या गुंतवणुकीतून मोठा परतावा (रिटर्न) मिळू शकतो. करिअरला एक नवीन आणि सकारात्मक दिशा मिळेल.
३. कर्क राशी (Cancer):
कर्क राशीमध्येच हा गुरु-शुक्राचा महासंयोग होत आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना या काळात समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडून येईल. आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल, तर हा काळ अतिशय उत्तम आहे. व्यवसायात मोठा नफा होईल. इच्छित ठिकाणी प्रवास करण्याची संधी मिळू शकते.
४. कन्या राशी (Virgo):
कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु-शुक्र युती आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. जमीन, घर किंवा वाहन खरेदीचे प्रबळ योग आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांची प्रतीक्षा आता संपेल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
