Guru Gochar in Leo: गुरु उद्यापासून सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. गुरु सिंह राशीत आल्यानंतर अनेक असामान्य परिणाम पाहायला मिळतील. जागतिक स्तरावर वेगाने बदल घडू शकतात. सोने-चांदीच्या किमतींमध्येही मोठे चढ-उतार होऊ शकतात. मघा नक्षत्रातील सिंह राशीतील गुरु ऐश्वर्य देणारे ठरू शकतात. सिंह राशीत गुरु आल्याने मान-सन्मान आणि वर्चस्वही वाढू शकते. मात्र, सिंह राशीच्या लोकांनी अहंकार आणि अति आत्मविश्वास टाळावा, अन्यथा अडचणीत येऊ शकता.

३१ ऑक्टोबर रोजी गुरु सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. ते २४ जानेवारीपर्यंत या राशीत राहतील. या ८७ दिवसांत तुमच्या आयुष्यात कोणत्या चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहावे, हे जाणून घेऊया.

या काळात महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. ज्यांना गुरु ग्रहाशी संबंधित दान करायचे आहे, त्यांनी या काळात हळद, पिवळे कपडे यांसारख्या वस्तूंचे दान करावे. हे दान शुभ मानले जाते.

या काळात गुरुची दृष्टी पंचम भाव आणि प्रथम भावावर राहील. ज्यांना वैयक्तिक कुंडलीनुसार माहिती जाणून घ्यायची असेल, त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली कुंडली पाहू शकता आणि त्यानुसार या गोष्टी समजून घेऊ शकता.

या काळात महागाई वाढू शकते. तसेच सत्तेत बदल होण्याचीही शक्यता आहे. येथे आपण सिंह राशीबद्दल बोलणार आहोत. त्याचबरोबर मेष ते कर्क राशीपर्यंतच्या लोकांनाही काय परिणाम होतील, हेही जाणून घेऊया.

मेष ते कर्क राशीच्या लोकांना काय फळ मिळेल?

मेष: शिक्षण, सर्जनशीलता आणि प्रेमसंबंधांसाठी हा काळ चांगला राहील. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. साडेसातीचा नकारात्मक प्रभावही काही प्रमाणात कमी होईल.

वृषभ: धनसंपत्ती आणि मानसिक शांततेत सुधारणा होईल. आर्थिक नियोजन कराल. कुटुंबाची जबाबदारी सांभाळाल. मात्र, भावनिकदृष्ट्या जास्त संवेदनशील राहू शकता.

मिथुन: अधिक मेहनत करावी लागेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. लहान भाऊ-बहिणींना चांगला लाभ मिळू शकतो. फक्त नशिबावर अवलंबून राहू नका.

कर्क: आर्थिक स्थितीवर चांगले नियंत्रण राहील. उत्पन्न वाढेल आणि बचतही करता येईल. मात्र, बोलताना संयम ठेवणे गरजेचे आहे. कोणाशीही बोलताना विचारपूर्वक शब्दांचा वापर करा.

सिंह राशीवर काय परिणाम होईल?

गुरुच्या सिंह राशीतील गोचरामुळे सिंह राशीच्या लोकांचा समाजातील मान-सन्मान वाढेल. तुमचे सामाजिक स्थान अधिक मजबूत होईल. संतती, शिक्षण आणि सर्जनशील कामांमध्ये चांगले यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच आयुष्यात सकारात्मकता वाढेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)