scorecardresearch

पुढील २ महिन्यात ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? गुरूदेव मिळवून देणार बक्कळ धनलाभाची संधी

Jupiter Rise 2023:बृहस्पति मीन राशीत उदयास येणार आहे. ज्यामुळे 3 राशीच्या लोकांना चांगला पैसा मिळू शकतो.

पुढील २ महिन्यात ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? गुरूदेव मिळवून देणार बक्कळ धनलाभाची संधी
फोटो: संग्रहित

Jupiter Rise 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रहाचा उदय किंवा अस्त होतो. त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर झालेला पाहायला मिळतो. मार्च २०२३ मध्ये गुरु ग्रहाचा उदय (Jupiter Rise In March 2023) होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा ३ राशी आहेत, ज्यांच्याशी संबंधित लोकांना यावेळी चांगला पैसा मिळू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

कर्क राशी

गुरु ग्रहाचा उदय होताच तुमचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीतून नवव्या भावात उदयास येणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचे भाग्य चमकू शकते. तसेच, यावेळी तुम्हाला कोणत्याही योजनेत यश मिळू शकते. त्याच वेळी, या कालावधीत, आपण व्यवसाय किंवा इतर कोणत्याही कामासाठी प्रवासाला जाऊ शकता. यासोबतच परदेशात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी गुरूचा उदय शुभ मानला जातो.

मिथुन राशी

तुमच्यासाठी गुरूचा उदय करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. कारण गुरु तुमच्या राशीतून दशम स्थानात उदयास येणार आहे . त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळू शकते. यासोबतच नोकरी करणाऱ्यां लोकांची त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. दुसरीकडे, व्यापारी वर्गाला यावेळी व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात, ज्यामुळे त्यांना चांगली कमाई होऊ शकते. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

( हे ही वाचा: मकर संक्रांतीच्या आधी ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? बुधदेव वर्षभर मिळवून देणार प्रचंड धनलाभाची संधी)

कुंभ राशी

गुरू ग्रहाचा उदय कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण बृहस्पति तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात उदयास येणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला आर्थिक बाबतीतही यश मिळू शकते. तसेच या काळात अडकलेले पैसे मिळू शकतात. यावेळी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच, जे मार्केटिंग, शिक्षण आणि मीडिया लाईनशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 12:02 IST

संबंधित बातम्या