Guru Uday in Mithun Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. त्याचप्रमाणे उदय व अस्त होत असतो. जुलै महिन्यात ग्रह गोचरासह ग्रहांचे उदय सुद्धा होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. सध्या गुरु मिथुन राशीत विराजमान आहेत आणि ९ जुलै २०२५ रोजी पहाटे ४:४४ वाजता देवगुरु मिथुन राशीत उदयास येणार आहेत. गुरु उदय झाल्यावर काही राशींवर त्याचा अत्यंत शुभ प्रभाव दिसून येणार आहे. बृहस्पतीच्या उदयाने पाच राशींना जबरदस्त लाभ होणार आहे. संतानप्राप्ती, धनलाभ, शिक्षणात यश, विवाहाचे योग, धार्मिक कार्यात रुची आत्मविश्वासात वाढ, व्यवसायातील नवे संधी, तसेच प्रवासातून मिळणारे फायदे हेही या काळात अनुभवता येणार आहेत. चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
मेष
गुरूच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या राशीच्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो.
वृषभ
देवगुरुच्या कृपेने वृषभ राशीचे लोक नोकरी आणि करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकतात. स्टॉक मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकते. पूर्वी एखादी आर्थिक गुंतवणूक केली असेल, तर त्याचा फायदा मिळू शकेल. अनपेक्षित आर्थिक लाभामुळे तुमचं बँक बॅलेन्स वाढू शकतो.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरूचा उदय शुभ परिणाम घेऊन येणारा ठरु शकतो. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू शकतो. तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. पैशाशी संबंधित कामात तुम्हाला यश मिळू शकतो. नवीन स्रोतांमधून उत्पन्न मिळण्याची शक्यता देखील असू शकते. बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
तूळ
गुरुचा उदय तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकतो. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. नोकरदार लोकांना पदोन्नती आणि उत्तम करिअरच्या संधी मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. करिअरचे नवे पर्याय तुमच्यासमोर खुले होऊ शकतात. तसंच तुम्हाला वडील आणि वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होऊ शकतो.
वृश्चिक
गुरुचा उदय वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारा ठरु शकतो. ज्या लोकांचे काम रिअल इस्टेट, मालमत्ता आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित आहे त्यांना चांगला लाभ मिळू शकतो. यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. या काळात तुमच्या धन-संपत्ती चांगली वाढ झालेली दिसून येऊ शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)