Hans And Malavya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह हा वैभव, संपत्ती यांचा कारक मानला जातो. म्हणूनच जेव्हा जेव्हा शुक्राचे संक्रमण होते तेव्हा त्याचा प्रभाव या क्षेत्रांसह सर्व राशींवर दिसून येतो. १५ फेब्रुवारीला शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशीमध्ये मीनमध्ये प्रवेश करणार आहे (Venus Planet Transit In Meen). त्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. दुसरीकडे, हंस नावाचा राजयोग बनवून गुरु ग्रह आधीच विराजमान आहे, ज्यामुळे ३ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मिथुन राशी

मालव्य राज योग मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण तुमच्या पारगमन कुंडलीत कर्माच्या घरावर शुक्र ग्रह उच्च स्थानावर विराजमान असेल आणि त्यासोबत गुरू सुद्धा सोबत असेल, ज्यामुळे हंस राज योग देखील तयार होईल. यावेळी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. तसेच, या काळात तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल. यावेळी तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच. त्यांना याकाळात बढती आणि वेतनवाढ मिळू शकते.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Shukra Transit: 31 March Malavya Rajyog In Meen Rashi
३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?

कन्या राशी

मालव्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। कारण हा योग तुमच्या राशीतून सप्तम भावात तयार होईल. जे वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे स्थान मानले जाते. त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. तसेच व्यवसाय करार होऊ शकतो. तसेच, तुम्ही भागीदारीचे काम सुरू करू शकता. त्याचबरोबर तुम्ही परदेशातही प्रवास करू शकता. या दरम्यान तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असणार आहे. तुम्हाला फक्त या संधीचा फायदा घ्यावा लागेल.

( हे ही वाचा: १२ महिन्यांनी होणार सूर्य आणि शुक्राची युती; ‘या’ राशीच्या लोकांना मिळू शकतो अपार पैसा आणि श्रीमंती)

धनु राशी

मालव्य राज योग तयार झाल्याने धनु राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या राशीतून चौथ्या घरात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही वाहन किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. यासोबतच हंस राज योगही तयार होत आहे. त्यामुळे तुम्ही राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला पद मिळू शकते. त्याच वेळी, व्यवसायात नवीन करार निश्चित केला जाऊ शकतो. तसंच तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. यासोबतच तुम्हाला शनिदेवाची कृपाही मिळेल. कारण १७ जानेवारीपासून तुम्हाला साडेसतीपासून सुटका मिळाली आहे.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)