धार्मिक ग्रंथानुसार हनुमान हे सात चिरंजीवांपैकी एक आहेत. चिरंजीवी अश्वत्थामा, महर्षि वेद व्यास, विभीषण, बली, कृपाचार्य आणि भगवान परशुराम हे इतर सहा आहेत. कलियुगात हनुमानाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. हनुमानाचे नाव घेतल्याने संकटे टळतात असे म्हणतात. या आठवड्यात हनुमान जयंती आहे. अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यातील पौर्णिमेला झाला. यंदा ही तारीख १६ एप्रिलला येत आहे. हनुमान जयंती २०२२ च्या दिवशी हनुमानाची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया.

हनुमानाच्या पूजेचे नियम :

  • धार्मिक शास्त्रानुसार हनुमानाच्या पूजेमध्ये बुंदीचे लाडू वापरावेत. असे मानले जाते की हनुमानजींना लाडू खूप प्रिय आहेत. त्याचबरोबर हनुमानाच्या पूजेत चरणामृत वापरले जात नाही.
  • शास्त्रात हनुमानाला पूर्ण ब्रह्मचारी म्हटले आहे. त्यामुळे हनुमानाच्या उपासनेदरम्यान पूर्ण ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. यासोबतच पूजेदरम्यान विचारही शुद्ध ठेवावेत.

‘या’ राशींसाठी भाग्यवान आहे सोन्याची अंगठी; आनंदाच्या मार्गातील अडथळे होतात दूर

pink moon 2024
गुलाबी साडीचा विषय सोडा, आकाशात दिसणार चक्क ‘गुलाबी चंद्र’; आज पौर्णिमेला ‘या’ वेळेत पाहा ‘पिंक मून’
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर पालटणार नशीब, ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य
  • हिंदू धार्मिक मान्यतेनुसार मंगळवार आणि शनिवार हे हनुमानाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहेत. याशिवाय या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेवाचा प्रकोपही दूर होतो.
  • हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या पूजेच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन करू नये. याशिवाय या दिवशी मांस आणि लसूण-कांदा यांचेही सेवन टाळावे.

शनिदोषापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय

  • यावेळी हनुमान जयंती शनिवारी येत आहे. अशा स्थितीत शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठीही हा दिवस विशेष मानला जातो. शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी हनुमानाची पूजा करावी.

तुळशीची सुकलेली पाने चमकावणार नशीब; जाणून घ्या कसा करावा वापर

  • याशिवाय या दिवशी शनिदेवांसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच गरजू लोकांमध्ये दान करावे. असे केल्याने शनिदेवाच्या स्थितीत लाभ होतो असे मानले जाते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)