Aajche Rashi Bhavishya 2 April 2026 In Marathi : आज १ एप्रिल २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी असणार आहे. त्याचबरोबर ध्रुव योग जुळून येईल आणि हस्त नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून १७ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून ०७ मिनिटांपर्यंत असणार आहे. राहू काळ १ वाजता सुरु होईल ते ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती असणार आहे. आज मारुतीराया तुमच्या राशीला कसा आशीर्वाद देणार जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, २ एप्रिल २०२६ (Dainik Rashi Bhavishya 2 April 2026 In Marathi)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

खाण्यावर बेताने ताव मारा. विद्यार्थ्यांसमोर नवीन संधि चालून येईल. शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. आशावादी दृष्टिकोन ठेवावा.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

धार्मिक गोष्टीत प्रगती कराल. हवामानानुसार काही बदल करावेत. महत्त्वाची कामे पार पडतील. प्रामाणिकपणा व सचोटी सोडू नका. मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

उपासनेमुळे काही त्रास कमी होतील. काही क्षणिक आनंद घ्याल. जबाबदारी सक्षमपणे पेलाल. निर्धास्तपणे वागू नका. जोडीदाराचे मत जाणून घ्यावे.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

जोडीदाराच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. वडीलधार्‍यांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक नाराजी दूर करावी. सार्वजनिक कामात कौतुक केले जाईल. नोकरदारांनी नरमाईची भूमिका घ्यावी.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

योग्य अयोग्याची शहानिशा करावी. भावनेच्या आहारी जाऊ नका. कलाकारांच्या कलेचे कौतुक केले जाईल. सांधेदुखीचा त्रास संभवतो. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

धीर व संयम बाळगावा लागेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारी राहतील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. चारचौघांत कौतुक केले जाईल.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

भावंडांशी वादाचे प्रसंग संभवतात. सारासार विचारातून कृती करावी. लॉटरी सारख्या व्यवहारातून फायदा संभवतो. देणी फेडता येतील. सासुरवाडीकडून शुभवार्ता मिळेल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

अधिक कष्टाची गरज पडेल. गणेशाची उपासना करावी. वैवाहिक सौख्यात मिठाचा खडा पडू देऊ नका. मनोरंजनाचे बेत आखले जातील. विरोधकांची संख्या वाढू शकते.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

घरातील ताणतणाव दूर करावेत. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला मानावा. कोणतेही टोकाची भूमिका घेऊ नये. आर्थिक व्यवहारात दक्षता बाळगावी. धार्मिक कामात मन गुंतवावे.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

लेखन कलेला वाव मिळेल. चटकन मत प्रदर्शित करू नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नये. गरज पडल्यास शांत राहावे. आरोग्याची काळजी घ्यावी.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. सामुदायिक गोष्टींचे भान ठेवावे. घरातील कामात गुंग व्हाल. नवीन मित्र जोडावेत. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

छंद जोपासायला वेळ द्या. अधिकारी व्यक्तींचा वेळोवेळी सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. सडेतोडपणे मत मांडाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर