Hanuman Jayanti 2026 Horoscope: आज २ एप्रिल २०२६, गुरुवार रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमा असून देशभरात ‘हनुमान जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योगांनी भरलेला आहे. आज मंगळ ग्रहाचे मीन राशीत गोचर होत असून, चंद्र आणि मंगळ एकमेकांच्या समोरासमोर समसप्तक असल्याने ‘धन योग’ निर्माण होत आहे.
त्याचबरोबर चंद्र आणि गुरु यांच्या केंद्र स्थितीमुळे ‘गजकेसरी योग’ आणि बुध-शुक्राच्या विशिष्ट स्थितीमुळे ‘अधि योग’ देखील जुळून येत आहे. या महायोगांमुळे मेष, मिथुन, कर्क, कन्या आणि वृश्चिक या ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा ठरणार आहे.
मेष राशी (Mesh rashi)
मेष राशीच्या लोकांसाठी आजपासून सुरू होणारा धन योग फायदेशीर ठरेल. विशेषतः वीज उपकरणे आणि व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. नोकरीत तुमचा सन्मान वाढेल. जरी खर्च वाढण्याची शक्यता असली, तरी मालमत्तेशी संबंधित कामातून लाभ होईल. धार्मिक प्रवासाचे योग आहेत.
मिथुन राशी (Mithun rashi)
आज तुमचा उत्साह द्विगुणित असेल. तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. मुलांशी संबंधित समस्या सुटतील. वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहील आणि जोडीदारासोबत धार्मिक स्थळी प्रवासाचे नियोजन होईल. नोकरीत संयम राखल्यास यश नक्की मिळेल.
कर्क राशी (Kark rashi)
आर्थिक आघाडीवर आजचा दिवस लाभदायक आहे. नशीबाची साथ मिळाल्याने कमाईच्या नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते, जी तुमची पात्रता सिद्ध करण्याची संधी असेल. चतुरपणे घेतलेले निर्णय व्यवसायात वृद्धी घडवून आणतील.
कन्या राशी (Kanya rashi)
कन्या राशीच्या व्यक्तींना आज नवीन ऊर्जा जाणवेल. करिअरमध्ये नवीन सुरुवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी चांगली कामगिरी करतील. गुंतवणुकीपूर्वी कागदपत्रांची नीट तपासणी करा. कौटुंबिक वाद मिटल्याने घरात सुख-शांती राहील.
वृश्चिक राशी (Vrushchik rashi)
तुमच्या राशीचा स्वामी मंगळ पंचम भावात प्रवेश करत असल्याने कामाच्या निमिताने केलेले प्रवास यशस्वी होतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय असल्यास शुभ वार्ता मिळेल. प्रेमाच्या बाबतीत एखादा धाडसी निर्णय घेऊ शकता. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि मुलांकडून आनंद मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
