Hanuman Jayanti 2026 Puja Vidhi, Muhurat In Marathi : दरवर्षी हनुमान जयंती हा पवित्र सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, चैत्र महिन्याच्या शुल्क पौर्णिमेच्या दिवशी माता अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी संकटमोचन हनुमानाचा जन्म झाला. असा विश्वास आहे की, या दिवशी योग्य विधींसह बजरंग बलीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि भक्तांना शक्ती, बुद्धी व ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो. यंदा हनुमान जयंती २ एप्रिल २०२२ रोजी आहे.

हनुमानजींना संकटमोचन, अंजनीसुत, पवनपुत्र इत्यादी नावांनीदेखील ओळखले जाते. असे मानले जाते की, या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने शत्रूंवर विजय मिळविता येतो आणि आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते. पण, यंदा हनुमान जयंतीचे शुभ मुहूर्त काय, पूजा विधी काय विषयीची माहिती जाणून घेऊ…

हनुमान जयंती केव्हा आहे? (Hanuman Jayanti 2026 Puja Vidhi, Muhurat)

चैत्र महिन्याची पौर्णिमा प्रारंभ – १ एप्रिल रोजी सकाळी ७:०६ वाजता.
चैत्र महिन्याची पौर्णिमा समाप्त- २ एप्रिल रोजी सकाळी ७:४१ वाजता.

हनुमान जयंती २०२६ ची तारीख – गुरुवार, २ एप्रिल २०२६

हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त (Hanuman Jayanti 2026 Shubh Muhurat)

पहिला मुहूर्त – सकाळी ६:१० ते सकाळी ७:४४ पर्यंत
दुसरा मुहूर्त – सायंकाळी ६:३९ ते रात्री ८:०६ पर्यंत
ब्रह्म मुहूर्त – पहाटे ४:३८ ते पहाटे ५:२४ पर्यंत
अभिजीत मुहूर्त – दुपारी १२:०० ते दुपारी १२:५० पर्यंत

परंपरा आणि विधी (Hanuman Jayanti 2026 Viddhi)

हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त पहाटे लवकर उठून स्नान करतात आणि हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. हा विधी सामान्यतः सूर्योदयापूर्वी सुरू होतो. कारण- हा हनुमानाच्या जन्माचा तास मानला जातो. पहाटे भक्त ‘हनुमान चालीसा’ म्हणतात आणि गूळ, केळी व खायच्या पानाचा प्रसाद देतात. अनेक भक्त या दिवशी हनुमानाचा आशीर्वाद मिळावा यासाठी दिवसभर उपवाससुद्धा करतात.

हनुमानाचे मंत्र (Hanuman Jayanti 2026 Mantra)

पूजा विधी करताना तुम्ही हनुमानाच्या खालील मंत्राचा जप करू शकता.

भगवान हनुमानाचा मूळ मंत्र आहे – ओम श्री हनुमते नमः. ।

ॐ नमो भगवते हनुमते नमः

ॐ नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रुसंहारणाय। सर्वरोग हराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा

ओम नमो हनुमंतेश्वर रूपाय अमित विक्रमा प्रकट कार्या महा बलाय सूर्य कोटि समप्रभा

ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा

ॐ ह्रां ह्रीं ह्रं ह्रैं ह्रौं ह्रः॥ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्॥’

आध्यात्मिक महत्त्व (Hanuman Jayanti Importance Story And Significance)

श्री हनुमान हे रामायणातील एक महत्त्वाचे पात्र आहे आणि ब्रह्मचर्य, निष्ठा, नम्रता व निर्भयता यांचे प्रतीक आहेत. त्यांची पूजा केल्याने अडथळे दूर होतात, नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते आणि भक्तांमध्ये नवी शक्ती संचारते, असे मानले जाते.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे आणि लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करीत नाही.)