Mangal Gochar In Meen 2026: हिंदू धर्मात हनुमान जयंतीला विशेष महत्त्व असून हा सण चैत्र पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा ०२ एप्रिल २०२६ रोजी देशभर हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोणातूनही हा दिवस खूप खास मानला जातो. पंचांगानुसार, ०२ एप्रिल २०२६ रोजी मंगळ ग्रहाचा मीन राशीत प्रवेश होईल. मीन राशीत आधीपासूनच सूर्य आणि शनीदेव उपस्थित आहेत, ज्यामुळे या राशीत त्रिग्रही योग निर्माण होईल. हा योग १२ पैकी काही राशींसाठी खूपच लाभदायक ठरेल.

त्रिग्रही योग ‘या’ राशींचे नशीब चमकवणार

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी त्रिग्रही योग खूप उत्तम ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील.

कर्क (Kark Rashi)

कर्क राशीच्या लोकांसाठीही त्रिग्रही योग खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील.

वृश्चिक (Vruschik Rashi)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही तीन ग्रहांचे मीन राशीतील युती आनंदात जाईल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानी पडतील, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक चणचण भासणार नाही. या राशीच्या व्यापाऱ्यांनाही अनेक आर्थिक लाभ होतील. तुम्ही नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीच्या व्यक्तींसाठीही त्रिग्रही योग खूप खास असेल. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल. आकस्मिक धनलाभ होईल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या व्यक्तींसाठीही अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)