Happy Mahashivratri 2024: हिंदू धर्मात महाशिवरात्री सणाला खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशी तिथीला झाला होता, त्यानंतर ही विशेष तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री शुक्रवार, ८ मार्च रोजी साजरी होणार आहे. या दिवशी शिवभक्त भगवान शंकराची मनोभावे पूजा करून उपवास करतात. यानिमित्ताने देशभरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासोबतच एकमेकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही देतात.
यानिमित्ताने तुम्हीदेखील मित्रांना, कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून खास मराठीतून शुभेच्छा देऊ शकता. यासाठी महाशिवरात्रीवर आधारित काही मराठी शुभेच्छांची यादी पाहू …
Mahashivratri 2024: महाशिवरात्री ८ की ९ मार्चला? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी
महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा मेसेज (Mahashivratri Quotes & Wishes 2024)
दुःख दारिद्र्याचा नाश होवो
सुख समृद्धी दारी येवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
काळ तू, महाकाल तू,
तूच राजा, तूच प्रजा
तूच सत्य आणि तूच विश्वास
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
कारुण्य सिंधु भव दु:ख हारी
तुज विण शंभु मज कोण तारी,
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
शिवाच्या भक्तीने, शक्तीने
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
भगवान शिव तुमच्या कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव करो
तुम्हाला सुख, वैभव, समृद्धी आणि शांती देवो.
ओम नमः शिवाय
बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
शिव अनादि शिव अनं
शिवमहिमेने प्रकाशला आसमंत
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे
जय महाकाल हर हर महादेव….
न जगण्याचा आनंद न मरणाचे दुःख
जोपर्यंत आहे जीव तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरुवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!