Hartalika Vrat 2024 Date Puja Vidhi: हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात. असं म्हणतात, या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती, त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा-आराधना करतात. यंदा ६ सप्टेंबर २०२४ रोजी हे व्रत साजरे केले जाईल. चला तर मग जाणून घेऊया हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त आणि तिथी.

हरतालिका तिथी

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून २१ मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून १ मिनिटापर्यंत असेल. उदय तिथीनुसार, शुक्रवारी, ६ सप्टेंबर २०२४ रोजी हे व्रत साजरे केले जाईल.

5th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
५ सप्टेंबर पंचांग: गुरुवारी १२ पैकी कोणत्या राशीवर बरसणार स्वामींची कृपा? दुःख-संकट दूर तर प्रचंड धनलाभ होणार; वाचा तुमचे भविष्य
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
30th August Panchang & Marathi Rashi Bhavishya
३० ऑगस्ट पंचांग: रखडलेली कामे लागतील मार्गी, लक्ष्मीच्या कृपेने होईल अचानक धनलाभ; कसा असेल तुमचा शुक्रवार? वाचा राशीभविष्य
4th September Panchang & Marathi Rashi Bhavishya
४ सप्टेंबर पंचांग: बुधाच्या राशी परिवर्तनामुळे कोणाला होईल लाभ? अडकलेले पैसे मिळतील तर ‘या’ राशींवर होईल सुखाचा वर्षाव
Lord Ganesha Favourite Zodiac Signs
गणपतीला प्रिय आहेत ‘या’ ३ राशी! जाणून घ्या कोणत्या राशींवर असते बाप्पाची विशेष कृपा?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचांग : मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
September 2024 Grah Rashi Parivartan in Marathi
सप्टेंबर सुरु होताच ‘या’ राशींच्या व्यक्तींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? ३ मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?

हरतालिका शुभ मुहूर्त

सकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ते ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल. तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी २ तास ३१ मिनिटे असेल.

हरतालिका ब्रह्म मुहूर्त : सकाळी ४ वाजून ३० मिनिटांपासून ते ५ वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल.

अभिजीत मुहूर्त : सकळी ११ वाजून ५४ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत असेल.

राहूकाळ : सकाळी १० वाजून ४५ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून १९ मिनिटांपर्यंत असेल.

हरतालिका शुभ योग

यंदा हरतालिकेच्या दिवशी रवि योग, शुक्ल योगासह चित्रा नक्षत्र असणार आहे. हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते. या दिवशी रवि योग सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी लागेल, जे ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून २ मिनिटांनी समाप्त होईल.

हरतालिकेची पूजा कशी करावी?

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात. घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाचीदेखील पूजा केली जाते. तसेच हरितालिका कथेचे पठण केले जाते आणि गौरी मे प्रीयतां नित्यं अघनाशाय मंगला। सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये ।। या मंत्राचा जप केला जातो.

हेही वाचा: नुसता पैसा; तब्बल ३० वर्षांनंतर शनी आणि सूर्याने निर्माण केला ‘दुर्लभ योग’, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् प्रसिद्धी

हरतालिका व्रताची पौराणिक कथा आणि महत्त्व

पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती, त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते. पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला. ‘हर’ म्हणजे अपहरण करणे आणि ‘तालिका’ म्हणजे सखी, देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते, जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले, त्यामुळे या व्रताला ‘हरतालिका’ असे म्हटले जाते.

हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख-समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो, असे म्हटले जाते. हरतालिकेचे व्रत फक्त फळं खाऊन केले जाते. तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडले जाते.