scorecardresearch

Holi 2022: होळी सणाचे महत्त्व, होळाष्टक आणि होलिका दहनाचा शुभ मुहूर्त कधी आहे? जाणून घ्या

देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. पंचागानुसार होळीचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.

Holi1
Holi 2022: होळी सणाचे महत्त्व, होलिका दहनाचा शुभ मुहूर्त कधी आहे? जाणून घ्या

देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. पंचागानुसार होळीचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. तसेच, रंग खेळण्याच्या दिवसाला धूलिवंदन म्हणतात. तर होलिका दहन त्याच्या एक दिवस आधी होते. मात्र यंदा होळी कोणत्या दिवशी साजरी होणार आणि कोणत्या दिवशी होलिकादहन होणार याबाबत संभ्रम आहे. यंदा होळीचा सण १८ मार्चला शुक्रवारी आहे, तर होलिका दहन १७ तारखेला होणार आहे. तसेच १० मार्चपासून रोजी होळाष्टक सुरू होणार आहे. होलिका दहनाची शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात.

होलिका दहन शुभ मुहूर्त: दरवर्षी होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होते. या काळात भद्राची सावली नसते. त्यामुळे या वर्षी होलिका दहन गुरुवारी १७ मार्च रोजी आहे. होलिका दहनाची वेळ रात्री ०९.०६ ते १०.१६ पर्यंत आहे. मात्र या काळात भद्राची शेपूट असेल. शास्त्रानुसार होलिका दहन हे भद्राच्या अंशिक सावलीत करता येते. त्यामुळे १७ मार्च रोजी ९ वाजून ६ मिनिटांपासून होलिका दहन करता येईल. कारण या दिवशी भद्राची छाया समाप्ती रात्री उशिरा १ वाजून १२ मिनिटांनी होईल. ज्यांना भद्रानंतर होलिका दहन करायचे असेल, तर त्यांच्यासाठी मुहूर्त रात्री उशिरा १ वाजून १२ मिनिटे ते १८ मार्च रोजी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांपर्यंत आहे.

Holi 2022: हिंदू शास्त्रात होळी भस्मला विशेष महत्त्व, जाणून घ्या

प्रल्हाद आणि होलिकाची कथा: होलिका दहनानिमित्त भक्त प्रल्हाद आणि त्याची आत्या होलिका यांची कथा प्रसिद्ध आहे. प्रल्हाद हा भगवान विष्णूचा एक महान भक्त होते. त्याचे वडील राक्षस हिरण्यकश्यपू यांना ही भक्ती आवडत नव्हती. त्यामुळे त्याला त्याचा राग यायचा. यासाठी भक्त प्रल्हादाचं वध करण्याचं त्यांनी ठरवलं. यासाठी हिरण्यकश्यपूने बहीण होलिका हिची मदत घेण्याचं ठरवलं. होलिका हिला वरदान होते की ती अग्नीत जळू शकत नाही. म्हणून हिरण्यकश्यपूने तिला प्रल्हादला घेऊन अग्नीत बसण्याची आज्ञा केली. जेणेकरून भक्त प्रल्हाद जाळून मरेल. प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. त्या चितेमध्ये होलिका जळून खाक झाली. भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका दगावली.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Holi 2022 date time and shubh muhurt know rmt

ताज्या बातम्या