scorecardresearch

Holi 2022: हिंदू शास्त्रात होळी भस्मला विशेष महत्त्व, जाणून घ्या

वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा होणारा पहिला सण म्हणजे होळी. संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

Holi
Holi 2022: हिंदू शास्त्रात होळी भस्मला विशेष महत्त्व, जाणून घ्या (Photo- संग्रहित)

वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा होणारा पहिला सण म्हणजे होळी. संपूर्ण देशात होळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. होळी हा सण रंगांचा असल्यामुळे लहान मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचते. साधारणतः फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे. देशात होळी सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. असं असलं तरी हिंदू शास्त्रात होळीतील भस्माला विशेष महत्त्व आहे. या सणाशी निगडीत बऱ्याच समजुती आणि प्रथा आहे. या भस्मामुळे अनेक दोष दूर होतात, अशी मान्यता आहे. काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सण साजरे केल्याने चांगले फळ मिळते.

  • होळी सणाच्या दिवशी घराची नीट स्वच्छता करावी आणि भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराची पूजा करावी. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते.
  • होळी दहनावेळी अवश्य सहभागी व्हावे. काही कारणास्तव होलिका दहनाच्या दिवशी शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होळीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
  • होळीमध्ये जवस, वाटाणा, गहू किंवा हरभऱ्याच्या जुड्या यांपैकी जे तुमच्याकडे असेल ते होळीच्या आगीत भाजून प्रसादाच्या रूपात सर्वांना वाटावे.
  • होळीतील भस्म पुरुषांनी मस्तकावर आणि स्त्रियांनी गळ्याभोवती लावावे. यामुळे समाजात किर्ती वाढते आणि संपत्तीत वाढ होते अशी समज आहे.
  • होळीच्या दिवशी पिवळी मोहरी, लवंग, जायफळ आणि काळे तीळ काळ्या कपड्यात बांधा आणि पेटत्या होळीत टाका. असे केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपतो.
  • होळीतील भस्म लॉकरमध्ये किंवा जिथे पैसे ठेवता तिथे ठेवावी. असे केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही, अशी मान्यता आहे.
  • घरामध्ये शेणींची होळी अवश्य करा. तसेच त्यात कापूर जाळावा. असे केल्याने घरातील वातावरण सकारात्मक उर्जेने भरलेले राहते.
  • होळीच्या दिवशी वडिलधाऱ्यांच्या पायाच्या बोटांवर गुलाल लावून आशीर्वाद घ्यावा आणि लहानांना रंग लावून आशीर्वाद द्यावा.

Astrology: कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रातील उपाय जाणून घ्या

होळी दहनाचा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार होळी दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होते. होलिका दहनासाठी प्रदोष कालची वेळ निवडली जाते. या काळात भद्राची सावली नसते. यंदा होलिका दहन गुरुवारी १७ मार्च रोजी आहे. होळी दहनाचा शुभ मुहूर्त रात्री ९ वाजून ६ मिनिटांपासू ते १० वाजून १६ मिनिटांपर्यंत आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Holi 2022 special significance of bhasma in hindu scriptures rmt

ताज्या बातम्या