scorecardresearch

महालक्ष्मी राजयोग बनल्याने ३ राशींना होणार बलाढ्य धनलाभ? होळीआधी ग्रह युती होताच तुम्हीही व्हाल श्रीमंत?

Mangal Transit: २६ फेब्रुवारीपासून पुढे ३१ मार्च पर्यंत महालक्ष्मी राजयोग बनल्याने काही राशींना बक्कळ धनलाभ होण्याची चिन्हे आहेत.

Holi 2023 Mahalakshmi Rajyog Mars And Chandrama Yuti Will Make These Three Zodiac Signs Rich With Huge Bank Balance
महालक्ष्मी राजयोग बनल्याने ३ राशींना होणार बलाढ्य धनलाभ? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mangal Transit Chandra Yuti Mahalaxmi Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात याचा प्रभाव ग्रहाच्या स्थानानुसार शुभ- अशुभ दिसून येतो. जेव्हा काही ग्रह गोचर कुंडलीत विशिष्ट स्थानी येतात तेव्हा त्यातून काही महायोग किंवा राजयोग तयार होत असतात, येत्या ४ दिवसात असाच एक अत्यंत शुभ असा महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. मंगळ व चंद्राच्या युतीने वृषभ राशीत महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. २६ फेब्रुवारीपासून पुढे ३१ मार्च पर्यंत या योगातून काही राशींना बक्कळ धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. महालक्ष्मी राजयोग बनल्याने तीन राशींच्या भाग्यात सोन्याहून पिवळा सुखाचा काळ सुरु होऊ शकतो, अचानक झालेल्या धनलाभाने या राशी आर्थिक दृष्टीने मजबूत होऊ शकतील. चला तर पाहुयात या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत..

मेष (Aries Zodiac)

मेष राशीसाठी महालक्ष्मी राजयोग अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत धन स्थानी राजयोग तयात होत आहे. येत्या काळात आपल्याला अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतात. जर तुमचा व्यवसाय असेल तर येत्या काळात तुम्हाला मोठ्या धनलाभाचे योग आहेत. यात्रेची सुद्धा संधी मिळू शकते. जर आपले काम प्रवास, मार्केटिंग या क्षेत्राशी संबंधित असेल तर तुम्हाला अर्थाजनाचे नवे स्रोत लाभू शकतात. येत्या काळात आपल्याला धन- संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येईल शिवाय भौतिक सुखातही वुद्धी होऊ शकते. येत्या काळात वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

वृषभ (Taurus Zodiac)

महालक्ष्मी योग्य आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. आपल्याच राशीत या राजयोग तयार होत असल्याने आपल्याला याचा थेट प्रभाव अनुभवता येऊ शकतो. येत्या काळात आपल्याला मान-सन्मान लाभेल. एवढंच नाही तर आत्मविश्वास वाढल्याने नेतृत्व करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. जर आपण मीडिया, मनोरानां किंवा क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित काम करत असाल तर आपल्याला येणारा काळ फायद्याचा ठरू शकतो. आपल्याला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तसेच जोडीदाराची सुद्धा साथ लाभेल.

हे ही वाचा<< गुढीपाडव्याच्या आधी ‘या’ ३ राशींना लक्ष्मी करणार श्रीमंत? नववर्षात मंगळ ‘या’ रूपात देईल धनलाभाची संधी

कर्क (Cancer Zodiac)

महालक्ष्मी राजयोग हा आपल्यासाठी एक वरदान सिद्ध होऊ शकतो. आपल्या गोचर कुंडलीत चंद्र लग्न स्थानी स्थित असल्याने दहावे व पाचवे स्थान प्रभावात राहील. हे स्थान कर्म व धनाचे मानले जाते. मंगळ व चंद्राच्या युतीने आपल्याला सुख समाधानाच्या वस्तू व गोष्टी मिळू शकतील. जर आपण संततीप्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर आपल्याला येत्या काळात यश लाभू शकते. आपल्याला कार्यस्थळी मान- सन्मान लाभू शकते तसेच गुंतवणुकीतून सुद्धा आर्थिक फायदे मिळू शकतात.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 13:27 IST
ताज्या बातम्या