Holi 2026 Rahu Ketu Budh Guru Vakri : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि केतू हे ग्रह नेहमीच उलट दिशेने भ्रमण करतात. त्यात धन आणि बुद्धीचा दाता असलेला बुध ग्रह २६ फेब्रुवारी २०२६ पासून वक्री झाला आहे आणि २० मार्चपर्यंत तो तसाच राहील. त्याचप्रमाणे ५ डिसेंबर २०२५ रोजी गुरू ग्रह वक्री झाला आहे, जो ११ मार्च २०२६ पर्यंत तसाच राहील. ४ मार्च रोजी होळीच्या दिवशी चार ग्रहांच्या वक्री गतीचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होईल ते जाणून घेऊ….

राहूचा सुवर्ण प्रभाव

राहू हा गोंधळ आणि अनपेक्षित घटनांसाठी जबाबदार ग्रह आहे. होळीच्या दिवशी राहूची उलटी चाल मेष व सिंह या राशींच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ, तसेच करिअरमध्ये प्रगती होण्याच्या दृष्टीने मदत करील. जास्त धोकादायक गुंतवणूक टाळा. कारण- त्यामुळे नुकसान होऊ शकते.

केतूचा गुप्त लाभ

अध्यात्माचा ग्रह असलेल्या केतूच्या वक्री गतीमुळे मकर आणि वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल. या व्यक्तींना गूढ शास्त्रांमध्ये रस निर्माण होऊ शकतो. त्यांना मानसिक शांतीदेखील मिळू शकते. केतू अनपेक्षित स्रोतांकडून आर्थिक लाभदेखील मिळवून देऊ शकतो.

बुध ग्रह देईल व्यवसायात नफा

बुध हा धन व बुद्धीचा ग्रह आहे आणि होळीच्या दिवशी त्याची वक्री चाल मिथुन व कन्या या राशींच्या लोकांच्या करिअरसाठी फायदेशीर ठरू शकते. जर पदोन्नतीची चर्चा होत असेल, तर तुमचा बॉस सहमत होऊ शकतो. त्याशिवाय व्यावसायिकांना लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे.