Dhan Yog 2026 : राक्षसांचा गुरु शुक्राने १ मार्च रोजी गुरुच्या मीन राशीत प्रवेश केला आहे. जिथे शनीशी संयोग झाल्याने धनयोग निर्माण होईल. दोन मैत्रीपूर्ण ग्रहांचा हा संयोग १२ राशींच्या जीवनावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या परिणाम करणार ठरु शकतो.जवळजवळ ३० वर्षांनी धनयोग तयार होत आहे. शनि आणि शुक्राची युती वेळोवेळी होत असली तरी, मीन राशीतील ही युती खूप खास आहे.

शुक्र त्याच्या उच्च राशी अर्थात मीन राशीत प्रवेश केल्याने धनराज योग निर्माण होत आहे. शुक्राचा मीन राशीतील प्रवेशाने आनंद, समृद्धी, संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. तर न्यायाचा देव शनिसह शुक्राचा संयोग संपत्ती, वैभव आणि समृद्धीचा एक विशेष योग निर्माण करेल. पण या योगाने काही राशींना विशेष फायदे मिळू शकतात.

दृक पंचांगानुसार, राक्षसांचा गुरु शुक्राने १ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश केला, जिथे तो २६ मार्चपर्यंत भ्रमन करेल.यामुळे तयार झालेला धन राज योग अंदाजे २६ दिवस टिकेल.

मेष

मेष राशीसाठी धन योग अत्यंत शुभ मानला जातो. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यश मिळू शकते, तसेच आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि संपत्तीमध्ये वेगाने वाढ होऊ शकते.कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकता. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन

मिथुन राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे.त्यामुळे धन योगाने या राशींच्या लोकांना अनेक क्षेत्रात फायदा होण्याची शक्यता आहे.परिणामी, तुमचा सन्मान आणि आदर वेगाने वाढू शकतो. तुमची सर्जनशीलता वाढू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तुमचे मित्र आणि प्रियजनांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतात.व्यक्तिमत्व सुधारू शकते, व्यावसायिक जीवनात तुम्हाला लक्षणीय वाढ दिसून येईल.वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात.भावंडांसह चांगला वेळ घालवाल. पण आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा.

तुळ

तुळ राशीवर शुक्र ग्रहाचेच नियंत्रण आहे. त्यामुळे या राशीखाली जन्मलेल्यांसाठी धन योग अत्यंत अनुकूल मानला जातो.त्यांना अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. आर्थिक भरभराट होऊ शकते. संपत्ती आणि समृद्धी देखील वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतात.